Thursday, August 21, 2025 04:40:43 AM

लँडिंग दरम्यान 2 विमानांची टक्कर! कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा मृत्यू

मंगळवारी सकाळी कॅनडातील दक्षिण मॅनिटोबा येथील स्टीनबाख साउथ विमानतळाजवळ हा अपघात झाला. हार्वेस एअर पायलट स्कूल प्रशिक्षणासाठी वापरत असलेल्या धावपट्टीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर विमानाचे अवशेष आढळले.

लँडिंग दरम्यान 2 विमानांची टक्कर कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा मृत्यू
Indian origin student pilot dies in Canada
Edited Image

वाशिंग्टन: कॅनडामधून मोठी बातमी समोर येत आहे. प्रशिक्षण विमानांच्या धडकेत 2 प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय वंशाच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने बुधवारी याबाबत माहिती दिली. मंगळवारी सकाळी कॅनडातील दक्षिण मॅनिटोबा येथील स्टीनबाख साउथ विमानतळाजवळ हा अपघात झाला. हार्वेस एअर पायलट स्कूल प्रशिक्षणासाठी वापरत असलेल्या धावपट्टीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर विमानाचे अवशेष आढळले.

दरम्यान, कॅनडातील भारतीय दूतावासाने एक्सवरील  एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मॅनिटोबामधील स्टीनबाखजवळ हवेत झालेल्या धडकेत प्राण गमावलेल्या तरुण भारतीय विद्यार्थी पायलट श्रीहरी सुकेश यांच्या दुःखद निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी वाणिज्य दूतावास शोकाकुल कुटुंब, पायलट प्रशिक्षण शाळा आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहे. 

हेही वाचा - अ‍ॅक्सिओम-4 टीम अंतराळात अडकली? शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार नाही

तथापी, स्थानिक माध्यमांमधील वृत्तांनुसार श्रीहरी यांनी आधीच त्यांचे खाजगी पायलट परवाने मिळवले होते आणि ते व्यावसायिक पायलट प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करत होते. हार्वेज एअर पायलट ट्रेनिंग स्कूलचे अध्यक्ष अॅडम पेनर यांच्या मते, घटना घडल्या तेव्हा दोन्ही विद्यार्थी वैमानिक लहान सेस्ना सिंगल-इंजिन विमानांमध्ये टेकऑफ आणि लँडिंगचा सराव करत होते. पेनर यांनी सांगितले की, दोन्ही वैमानिक एकाच वेळी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोन्ही विमानांची समोरासमोर धडक झाली. 

हेही वाचा - हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजावर घडवून आणला स्फोट! टायटॅनिकसारखे बुडाले जहाज

अपघातानंतर, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) दोन्ही वैमानिकांना जागीच मृत घोषित केले. हार्वेज एअर पायलट ट्रेनिंग स्कूल 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला पेनरच्या पालकांनी सुरू केले होते. ही शाळा दरवर्षी सुमारे 400 विद्यार्थी वैमानिकांना प्रशिक्षण देते. जगभरातून विद्यार्थी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथे येतात.
 


सम्बन्धित सामग्री