इस्लामाबाद: पाकिस्तानने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृतपणे नामांकन केले आहे. पाकिस्तान सरकारने अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नामांकन करू शकते अशा अटकळ बांधल्या जात होत्या. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर या अटकळींना अखेर आता पुष्टी मिळाली आहे.
दरम्यान, पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'पाकिस्तान सरकारने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे नाव शिफारस केले आहे. अलिकडच्या भारत-पाकिस्तान संकटादरम्यान निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप आणि महत्त्वपूर्ण नेतृत्वासाठी सरकारने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिकपणे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.'
हेही वाचा - पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवर ३५ मिनिटांची चर्चा का झाली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे स्वागत केल्यानंतर ट्रम्प यांच्या नामांकनाची बातमी समोर येत आहे. जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मुनीर ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी गेले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता फील्ड मार्शल असलेले मुनीर यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्या नोबेल नामांकनाची बाजू मांडली होती. दोन्ही देशांमधील अणुयुद्ध टाळण्याचे श्रेय त्यांनी ट्रम्प यांना दिले.
हेही वाचा - 'आम्ही मध्यस्थी स्वीकारणारी नाही आणि स्वीकारणारही नाहीत...', पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर
मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील भेटीपूर्वी, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी माहिती दिली होती की ट्रम्प यांनी मुनीर यांचे जेवणाचे आयोजन केले होते. कारण त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखण्यासाठी राष्ट्रपतींना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकारी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणे हे एक मोठे राजनैतिक यश म्हणत आहेत.