Thursday, August 21, 2025 12:38:02 AM

पाकिस्तान एअरलाईन्सचा कारनामा..! कराचीच्या तिकिटात सऊदी अरबला पोहोचवलं..!

विमान कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग पास न तपासता आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक पासपोर्ट-व्हिसाही न पाहता एका प्रवाशाला सौदी विमानात चढण्यास सांगितले. यामुळे हा प्रवासी कराचीऐवजी सौदीला पोहोचला.

पाकिस्तान एअरलाईन्सचा कारनामा कराचीच्या तिकिटात सऊदी अरबला पोहोचवलं

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाहोरहून कराचीला जाण्यासाठीचे तिकीट खरेदी केलेला एक प्रवासी एअरलाइन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सौदी अरेबियात पोहोचला..! तोही चक्क पासपोर्ट आणि व्हिसा नसताना..! या प्रवाशाने लाहोरहून कराचीला जाण्यासाठीचे देशांतर्गत विमानाचे तिकीट घेतले होते. परंतु, त्याला निष्काळजी कारभारामुळे सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पोहोचवण्यात आले.

या गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे पाकिस्तानच्या विमान वाहतूक व्यवस्थेवर आणि विमानतळ सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाहजहान नावाच्या या पीडित प्रवाशाने एका खासगी एअरलाइन कंपनीकडून लाहोरहून कराचीला जाण्यासाठीचे तिकीट खरेदी केले होते. परंतु दोन तासांनंतरही विमान कराचीला पोहोचले नाही, तेव्हा त्याला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले.

नंतर त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, "डोमेस्टिक टर्मिनलवर उभ्या असलेल्या विमानात चढण्यापूर्वी मी माझे तिकीट क्रू मेंबर्सना दाखवले होते आणि त्यांनी ते तपासले, पण कोणीही मला थांबवले नाही. जेव्हा आम्ही दोन तासांनंतरही कराचीला पोहोचलो नाही, तेव्हा मी विचारले आणि त्यानंतर सर्वांना धक्का बसला." अशा प्रकारे कराचीला निघालेला माणूस सौदीला पोहोचला.

हेही वाचा - अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांसाठी मोठी बातमी! व्हिसा शुल्क वाढवण्याची तयारी सुरू

शाहजहानच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट कर्मचाऱ्यांनी केवळ त्याचा बोर्डिंग पास योग्यरित्या तपासला नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक असलेला त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासण्याची गरजही त्यांना वाटली नाही आणि या प्रवाशाला सौदीच्या फ्लाइटमध्ये चढण्यास सांगण्यात आले. हे कळल्यानंतर मी विरोध केला. तेव्हा एअरलाइन कर्मचाऱ्यांनी माझ्यावर दोषारोप करण्याचा प्रयत्न केला आणि परत येण्यास तीन दिवस लागू शकतात असे सांगितले. त्यानंतर शाहजहानने आता या घटनेबाबत एअरलाइनविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली आहे. या प्रवाशाने याला 'गंभीर निष्काळजीपणा' म्हटले आहे आणि प्रवास खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई मागितली आहे. त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे की, हे केवळ एअरलाइनच्या निष्काळजीपणाचे प्रकरण नाही तर आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन आहे.

लाहोर विमानतळ व्यवस्थापनाने देखील या चुकीसाठी एअरलाइनला जबाबदार धरले आहे आणि कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "पासपोर्ट किंवा व्हिसा नसलेल्या प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानात चढण्याची परवानगी देणे ही थेट सुरक्षेतील चूक आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे." अहवालानुसार, आता या प्रकरणाचा तपास फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) कडे सोपवण्यात आला आहे, जो कागदपत्रांशिवाय प्रवाशाला बोर्डिंग पास कसा मिळाला आणि त्याला विमानात चढण्याची परवानगी कशी देण्यात आली हे शोधून काढेल. सध्या एअरलाइनने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

हेही वाचा - काय सांगता!! जपानने तयार केले कृत्रिम रक्त


सम्बन्धित सामग्री