Sunday, August 31, 2025 06:31:44 AM

Flesh-eating Screwworm Parasite: धक्कादायक! जिवंत माणसांना खातो 'हा' किडा; मेक्सिकोमध्ये आढळले 5 हजार रुग्ण

या परजीवीला न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म असे म्हणतात. हा परजीवी जिवंत माणसांच्या किंवा प्राण्यांच्या जखमी त्वचेत अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारे कृमी (अळ्या) जिवंत मांसावर तुटून पडतात.

flesh-eating screwworm parasite धक्कादायक जिवंत माणसांना खातो हा किडा मेक्सिकोमध्ये आढळले 5 हजार रुग्ण

Flesh-eating Screwworm Parasite: जिवंत माणसांचे मांस खाणारा न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म नावाचा परजीवी आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. मेक्सिकोमध्ये याचे तब्बल 5086 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी 41 प्रकरणे मानवांमध्ये आढळली आहेत. अमेरिकेतदेखील पहिल्यांदाच एका व्यक्तीत हा परजीवी आढळल्याची पुष्टी यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ने केली आहे.

जिवंत माणसांना कसा खातो हा परजीवी?

या परजीवीला न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म असे म्हणतात. हा परजीवी जिवंत माणसांच्या किंवा प्राण्यांच्या जखमी त्वचेत अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारे कृमी (अळ्या) जिवंत मांसावर तुटून पडतात. त्यामुळे संसर्ग होतो आणि उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हे कृमी कधी कधी मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे सेप्सिससारखे गंभीर आजार उद्भवतात.

हेही वाचा - Antibiotics Side Effects: अँटीबायोटिक्स खाणे किती धोकादायक? नवीन संशोधनातून झाला धक्कादायक खुलासा

मेक्सिकोत सर्वाधिक रुग्ण

मेक्सिको हा या परजीवीचा सर्वाधिक बळी ठरला आहे. तेथे प्रामुख्याने गायी, घोडे, कुत्रे यांसारख्या प्राण्यांमध्ये हा संसर्ग आढळतो. मात्र 41 लोकांमध्ये हा परजीवी सापडल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. तथापी, अमेरिकेत मेरीलँड राज्यातील एका रुग्णामध्ये याचा पहिला रुग्ण सापडला असून तो नुकताच एल साल्वाडोरहून परतला होता.

हेही वाचा - Menstruation Delaying Pills : मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेतल्यानं युवतीचा मृत्यू; वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधं घेणं ठरू शकतं धोकादायक, तज्ज्ञ सांगतात..

हा परजीवी दक्षिण अमेरिकेतून हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्राणी उद्योगात मोठी चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'निर्जंतुक माशी उत्पादन सुविधा' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत नर माश्यांना किरणोत्सर्गाद्वारे वंध्य केले जाते आणि वातावरणात सोडले जाते. मादी माशी यांच्याशी जुळल्यास अंडी फलित होत नाहीत. या तंत्राचा वापर करून 1966 मध्ये अमेरिकेतून हा परजीवी हद्दपार करण्यात आला होता.

दरम्यान, प्राध्यापक मॅक्स स्कॉट यांच्या मते, या परजीवीचा प्रसार संक्रमित प्राण्यांची हालचाल आणि विद्यमान उपाययोजनांची प्रभावीता कमी होणे यामुळे होत आहे. तथापी, पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा आणि होंडुराससारख्या देशांमध्येही या संसर्गाचे नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या संसर्गामुळे 2024 मध्ये कोस्टा रिकामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 
 


सम्बन्धित सामग्री