Friday, September 12, 2025 07:14:27 PM

Sushila Karki Husband : सुशीला कार्की यांच्या पतीचा कारनामा; बॉलिवूड अभिनेत्रीचं प्लेन केलेलं हायजॅक, कोण आहेत दुर्गा प्रसाद सुबेदी

सुशीला कार्की यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या पतीचा कारनामा देखील चर्चेत आला आहे.

sushila karki husband  सुशीला कार्की यांच्या पतीचा कारनामा बॉलिवूड अभिनेत्रीचं प्लेन केलेलं हायजॅक कोण आहेत दुर्गा प्रसाद सुबेदी

मुंबई: नेपाळमध्ये सध्या भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरोधात मोठो आंदोलन सुरु आहे.  या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी त्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी केपी शर्मा ओली यांचं नाव पुढे येत आहे. 11 जुलै 2016 रोजी कार्की यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, ओली यांनी त्यावेळी कार्की यांना पाठिंबा दिला होता. सुशीला कार्की यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या पतीचा कारनामा देखील चर्चेत आला आहे. 

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या न्यायाधीश
कार्की यांनी फक्त एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांनी काही मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात निकाल देऊन स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या कडक भूमिकेमुळे त्या जनतेमध्ये विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र कार्की यांचा भूतकाळ हादरुन टाकणारा आहे. 

कार्की यांच्या पतीचा भूतकाळ वादग्रस्त 
सुशीला कार्की यांचे पती दुर्गा प्रसाद सुबेदी यांचा भूतकाळ वादग्रस्त आहे. 10 जून 1973 रोजी विराटनगरहून काठमांडूकडे जाणाऱ्या रॉयल नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले. सुबेदी यांच्यासोबत नागेंद्र ढुंगेल आणि बसंता भट्टाराई होते. भारतीय चलनातील 30 लाख रुपये घेऊन ते नेपाळला जात होते. या विमानात 19 प्रवासी होते, ज्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मला सिन्हा या देखील होत्या. त्याचबरोबर नेपाळचे अभिनेते जोडपे सीपी लोहानी हे देखील या विमानात प्रवास करत होते.

हेही वाचा: Nepal PM : सुशीला कार्की यांच्यासह चार जणांची नावं चर्चेत, नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची वर्णी ?

तत्कालीन नेपाळ काँग्रेस नेते गिरिजा प्रसाद कोईराला यांनी हा कट रचला होता. ते नेपाळचे चार वेळा पंतप्रधान झाले होते. दुर्गा प्रसाद सुबेदी हे त्यांचे सहकारी होते. विमान अपहरणानंतर बिहारमधील फोर्ब्सगंज येथे विमान उतरवण्यात आले. नंतर सुबेदी आणि इतरांना मुंबईत अटक झाली आणि 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सशस्त्र संघर्षासाठी म्हणजेच हत्यारं खरेदी करण्यासाठी त्यांनी हा कट रचला होता. 

पतीच्या भूतकाळापासून लांब राहून सुशीला कार्की यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी त्यावेळचे माहिती व दळणवळण मंत्री जया प्रकाश गुप्ता यांना तुरुंगात पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. तसेच भ्रष्टाचारविरोधी विभाग प्रमुख लोकमान सिंग कार्की यांना पदावरुन हटवले. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे त्यांनी नेपाळच्या न्यायव्यवस्थेत एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. 

बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेताना सुशीला कार्की यांची भेट दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाली. कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमी आणि पतीच्या वादग्रस्त आयुष्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारून त्यांनी स्वतःला एक प्रामाणिक आणि कर्तबगार न्यायाधीश म्हणून सिद्ध केले. 


सम्बन्धित सामग्री