Monday, September 01, 2025 01:43:11 AM

समुद्रात मोठ्या दुर्घटनेत चार बोटी बुडाल्या, 186 जण बेपत्ता; दरवर्षी जगण्यासाठीच्या संघर्षात जीवावर उदार होतात हे लोक

आफ्रिकेतून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी येमेन आणि जिबोटीजवळील पाण्यात उलटल्या आहेत, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 186 जण बेपत्ता आहेत, असे संयुक्त राष्ट्र स्तलांतर संस्थेने सांगितले.

समुद्रात मोठ्या दुर्घटनेत चार बोटी बुडाल्या 186 जण बेपत्ता दरवर्षी जगण्यासाठीच्या संघर्षात जीवावर उदार होतात हे लोक

सना : येमेन आणि जिबोटीजवळ चार बोटी बुडाल्याने दोन जणांचा मृत्यू, 186 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने (यूएन मायग्रेशन एजन्सी) सांगितले की, जिबोटीजवळ दोन मृतदेह सापडले आहेत. तर अनेक स्थलांतरित आणि पाच येमेनी कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.

आफ्रिकेतून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी येमेन आणि जिबोटीजवळील पाण्यात उलटल्या आहेत, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 186 जण बेपत्ता आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले. गुरुवारी उशिरा येमेनजवळ दोन बोटी उलटल्या.

हेही वाचा - पाकिस्तान बनला 'आतंकिस्तान'.. जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा 'विश्वविक्रम'

एकूण 186 जण बेपत्ता, 57 महिलांचा समावेश

तमीम एलियन म्हणाले की, दोन क्रू सदस्यांना वाचवण्यात आले आहे. परंतु, 181 स्थलांतरित आणि पाच येमेनी कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. येमेनमधील आयओएम मिशन प्रमुखांनी सांगितले की, जहाजावरील बहुतेक लोक इथिओपियन स्थलांतरित होते आणि पाच जण येमेनी कर्मचारी होते. दोन्ही बोटींमध्ये मिळून 57 महिला होत्या. एलियन म्हणाले की, त्याच वेळी जिबोटी या छोट्या आफ्रिकन राष्ट्राच्या समुद्रात आणखी दोन बोटी उलटल्या. दोन स्थलांतरितांचे मृतदेह सापडले आणि त्यातील इतर सर्व जण वाचले.

'वाचलेले कोणी सापडेल का, यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत. परंतु, मला भीती आहे की, आम्हाला एकही झण वाचलेला सापडणार नाही,' असे अब्दुसत्तर एसोएव्ह यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले.

तस्करांच्या मार्फत बेकायदा स्थलांतर

जवळजवळ दशकभर चाललेल्या गृहयुद्धानंतरही, पूर्व आफ्रिका आणि हॉर्न ऑफ आफ्रिकेतील स्थलांतरित आणि निर्वासितांसाठी येमेन हा एक प्रमुख मार्ग आहे. याच्याद्वारे लोक कामासाठी आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी लाखो लोक हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. येमेनला पोहोचण्यासाठी, तस्कर या लोकांना लाल समुद्र किंवा एडनच्या आखातातून धोकादायक, गर्दीने भरलेल्या बोटींमधून घेऊन जातात.

दरवर्षी इतके स्थलांतरित

2023 मध्ये येमेनला पोहोचणाऱ्या लोकांची संख्या 97 हजार 200 वर पोहोचली. ही संख्या 2021 मध्ये स्थलांतर केलेल्यांच्या संख्येच्या तिप्पट होती. पण गेल्या वर्षी, पाण्यामधील वाढत्या गस्तींमुळे ही संख्या 61 हजारच्या खाली आली, असे या महिन्यात आयओएमच्या अहवालात म्हटले आहे. आयओएमने म्हटले आहे की, 2024 मध्ये या मार्गावर 558 लोकांचा मृत्यू झाला. जानेवारीमध्ये, येमेनच्या समुद्रात त्यांची बोट उलटल्याने 20 इथिओपियन लोकांचा मृत्यू झाला.

इतके मृत्यू तरीही लोकांचे स्थलांतर सुरूच

गेल्या दशकात, या मार्गावर किमान 2,082 लोक बेपत्ता झाले आहेत, ज्यात 693 जण बुडाल्याचे ज्ञात आहे, असे आयओएमने म्हटले आहे. सध्या येमेनमध्ये सुमारे 3 लाख 80 हजार स्थलांतरित आहेत. रोजगाराच्या शोधात हे लोक या खतरनाक रस्त्याने प्रवास करतात, अपघात झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे, मात्र अजून एकही प्रवाशी सापडेला नाहीये. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Eid al-Adha: बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देऊ नका; या मुस्लिम देशातील राजाचं नागरिकांना आवाहन, हे आहे कारण


सम्बन्धित सामग्री