Thursday, September 04, 2025 11:28:53 AM

Elon Musk Girlfriend Shivon Zilis: एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन कोण आहे? जिने मस्कच्या 14 व्या मुलाला दिला जन्म

शिवॉन झिलिसने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये घोषणा केली आहे की, एलोन मस्क पुन्हा एकदा तिच्या मुलाचा पिता बनला आहे. एलोन मस्कच्या 14 व्या मुलाचे नाव सेल्डन लायकुर्गस ठेवण्यात आले आहे.

elon musk girlfriend shivon zilis एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन कोण आहे जिने मस्कच्या 14 व्या मुलाला दिला जन्म
Elon Musk Girlfriend Shivon Zilis
Edited Image

Elon Musk Girlfriend Shivon Zilis: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क 14 व्या मुलाचे वडील झाले आहेत. एलोन मस्कला आधीच 13 मुले होती. आता एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन झिलिसने मस्कच्या 14 व्या मुलाला जन्म दिला आहे. शिवॉनने स्वतः यासंदर्भात घोषणा केली होती. शिवॉन झिलिसने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये घोषणा केली आहे की, एलोन मस्क पुन्हा एकदा तिच्या मुलाचा पिता बनला आहे. एलोन मस्कच्या 14 व्या मुलाचे नाव सेल्डन लायकुर्गस ठेवण्यात आले आहे. एलोन मस्कला त्याची गर्लफ्रेंड शिवॉनपासून आधीच 3 मुले आहेत. तथापि, एलोन मस्क यांनी अद्याप या मुलाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

कोण आहे शिवॉन झिलिस ?

शिवॉन झिलिस ही एलोन मस्कची जोडीदार असून मस्कच्या न्यूरालिंकमध्ये संचालक देखील आहेत. शिवॉनने 2017 ते 2019 पर्यंत मस्कच्या कंपनी टेस्लामध्ये प्रकल्प संचालक म्हणून काम केले. शिवॉन ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मधील तज्ञ आहेत. यापूर्वी, एलोन मस्कची जोडीदार जस्टिन विल्सन होती, ज्यांच्यापासून त्यांना 6 मुले आहेत. याशिवाय, मस्कला संगीतकार ग्रिम्सपासून तीन मुले आहेत. 

हेही वाचा - अब्जाधीश एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप, शिवॉन झिलिससह गुपचुपपणे केले बाळाचे स्वागत

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी एलोन मस्क यांची भेट घेतली होती. एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट वॉशिंग्टन डीसीमधील ब्लेअर हाऊसमध्ये झाली, ज्यामध्ये एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन झिलिस आणि एलोन मस्कची तीन मुले देखील सहभागी झाली होती. या बैठकीत एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी एलोन मस्कच्या तिन्ही मुलांना पुस्तके भेट दिली.

हेही वाचा - टॉप 24 सुपर अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानीचा समावेश; कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या

 या भेटीदरम्यान, मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन झिलिस देखील उपस्थित होती. शिवॉन झिलिस या मस्कच्या न्यूरालिंक कंपनीत संचालक आहेत. एलोन मस्क यांना शिवोन गिलिसपासून दोन मुले आहेत. यामध्ये एक मुलगी अझ्युर आहे आणि दुसरा मुलगा स्ट्रायडर आहे. ही दोन्ही मुले जुळी आहेत. याशिवाय, एलोन मस्कच्या एका मुलाचे नाव एक्स आहे, जो कॅनेडियन गायिका ग्रिम्सचे अपत्य आहे.
 


सम्बन्धित सामग्री