Zelensky statement on Vladimir Putin
Edited Image
Zelensky statement on Vladimir Putin: युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक मोठे विधान केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरतील आणि यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध संपेल असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. द मिररच्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये एका मुलाखतीदरम्यान हे विधान केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या प्रकृतीबाबत अनेक अटकळ बांधली जात असताना झेलेन्स्की यांनी हे विधान केले आहे.
झेलेन्स्की काय म्हणाले?
बुधवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, 'तो (पुतिन) लवकरच मरेल आणि ही वस्तुस्थिती आहे, त्यानंतर हे युद्ध देखील संपेल.' युक्रेन आणि रशियाने 30 दिवसांसाठी ऊर्जा प्रतिष्ठानांवर हल्ले थांबवण्याचे मान्य केले असताना झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल ही टिप्पणी केली. पॅरिसमध्ये माध्यमांशी बोलताना, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी शांततेच्या प्रयत्नांना न जुमानता रशिया 'संघर्ष लांबवत असल्याचा' आरोप केला.
हेही वाचा - Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धाची आग पुन्हा भडकली! गाझा हल्ल्यात आतापर्यंत 50 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू
झेलेन्स्की यांनी रशियावर केले आरोप -
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. रशियन नेत्याला सतत खोकताना आणि त्यांचे हातपाय थरथरतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या अफवांना आणखी बळकटी मिळाली आहे. 2022 मध्ये, पुतिन यांचे माजी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी भेटतानाचा एक व्हिडिओ समोर आला. यावेळी, ते समोर टेबल धरून खुर्चीवर वाकून बसले होते. पुतिन पार्किन्सन आजार आणि कर्करोगाने ग्रस्त असल्याचेही अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तथापि, या अहवालांची पुष्टी होऊ शकलेली नाही.
हेही वाचा -T Coronae Borealis Explosion: पुढील आठवड्यात ब्रम्हाडांत होणार मोठा स्फोट! पृथ्वीपर्यंत पोहोचणार स्फोटोचा प्रकाश
रशियाने युक्रेन युद्ध
रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला केला आणि युद्धाची सुरुवात केली. रशियन सैन्याने युक्रेनमधील कीव, खार्किव्ह आणि मारियुपोलसह अनेक शहरांवर हल्ला केला. त्यानंतर युक्रेनने जोरदार निषेध केला, त्यानंतर संघर्ष लवकरच पूर्ण युद्धात रूपांतरित झाला.