ठाणे : मुंब्य्रात 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे. अत्याचार करून मृतदेह टेरेसवरुन फेकून दिला आहे. ही घटना ठाकूरपाडा परिसरात घडली आहे. मुलीचा मृतदेह अर्थनग्न अवस्थेत आढळला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. आव्हाड म्हणाले, काल रात्री मुंब्रा येथे एक अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला. त्या गरीब मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. तीन तासाच्या आत आरोपी अटकेत आणला त्याला ताब्यात घेतला. पुढे बोलताना, अत्याचार करणाऱ्या आरोपीची चौकशी पोलिसांच्या पद्धतीने सुरू असेल आणि यात जर अजून कोणी गुन्हेगार असतील, कोण साथीदार असतील. त्यांना पोलीस सोडणार नाही. पोलीस जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहे आणि पोलिसांची कारवाई कोणीही थांबवू शकत नाही असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : CBSC बारावीचा निकाल 2025 कधी जाहीर होईल? CBSC बारावीचा स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी वेबसाइट्स
मुंब्य्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला टेरेसवरून फेकण्यात आले. या प्रकरणातील आरोपी अटकेत आहे. जर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तर पोलिसांना कारवाई करू द्या. पोलीस गुन्हेगारांना सोडणार नाही. ही जबाबदारी आम्ही घेऊ अशी भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.