Sunday, August 31, 2025 08:39:41 AM

प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी दीपक काटेला अटक केली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर अजामीनपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर: प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी दीपक काटेला अटक केली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर अजामीनपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या दोघांना आज अक्कलकोट न्यायालयात हजर केले होते. विरोधकांनी दीपक काटेच्या अटकेची मागणी केली होती. यानंतर आता न्यायालयाने काटेला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसेच त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. या प्रकरणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आता गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज न्यायालयाने काटेला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा: तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये; सासरच्या छळाला कंटाळून छकुलीची आत्महत्या

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शाई फेक प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून बीएनएस कलम 118/2 हे कलम वाढवण्यात आले. आज या दोघांना अक्कलकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि काटेला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच सोलापूरच्या पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले होते. या निवदेनात आरोपींवर 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. 

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण? 
रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले. यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी गायकवाडांवर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच तो भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे अंधारे यांनी सांगितले होते. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यात भाजपाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री