Wednesday, August 20, 2025 02:05:04 PM

Diva: आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण

आईने पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोठ्या मुलीने मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.

diva आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण

ठाणे: आईने पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोठ्या मुलीने मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. 

ठाणे जिल्ह्यातील दिव्याच्या साबेगाव येथील यशोदा नावाच्या 28 वर्षीय आईने आपल्या साडेचार वर्षाची चिमुकलीला अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ तिच्या मोठ्या मुलगीने मोबाईलमध्ये चित्रित केला. घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार चिमुकलीच्या आईवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: Love Horoscope: आज तुमचे जोडीदारासोबत मतभेद किंवा भांडण होऊ शकते, जाणून घ्या...

ठाण्यातील दिव्यात संतापजनक घटना घडली आहे. एका आई स्वत:च्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. साडेचार वर्षाच्या चिमुकलीला मारताना या वैरिणीला काहीच कसे वाटले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मारहाणीनंतर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आईला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीच्या आईची दोन लग्न झाली आहेत. सध्या ती दुसऱ्या पतीजवळ राहत असून तो बंगळूरला कामाला आहे. पीडित चिमुकली ही पहिल्या नवऱ्यापासून झालेली असून तिच्यासह अजून चार मुले आहेत. तसेच चिमुकलीला मारहाण करतानाचा व्हिडीओ महिलेच्या दुसऱ्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीने काढला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ पीडित चिमुकलीच्या सावत्र बहिणीने तिच्या आजीला पाठवला. त्यानंतर तिच्या आजीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि यानंतर महिलेला अटक करण्यात आली. सध्या प्रकरणाचा शोध सुरु आहे. महिलेने मुलीला का मारहाण केली, याचा शोध घेत आहोत असे पोलिसांनी सांगितले. 

माझ्या नातीला मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात आली. एक वर्षापूर्वी माझी सून मुलाला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. तिच्यासोबत ती मुलांना घेऊन गेली. त्यानंतर आम्ही तक्रारदेखील केली. मात्र पोलिसांनीही आम्हाला सांगितले की मुलांची आई आहे, मुलांना तिच्याकडे असु द्या. त्यानंतर आम्ही विषय सोडून दिला. आम्हाला सतत समजत होतं की ही महिला राग आला की मुलांना खूप मारते. पंरतु आम्ही लक्ष दिले नाही. मात्र आज मुलीला जास्तच मारहाण करण्यात आली असे पीडित चिमुकलीच्या आजीने सांगितले आहे. तसेच मुलगी आमच्याकडे द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री