Sunday, August 31, 2025 11:25:55 AM

हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या, नातेवाईकांचा संताप; प्रेत 18 तास पोलीस ठाण्यातच

हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीतील ही घटना आहे.

हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या नातेवाईकांचा संताप प्रेत 18 तास पोलीस ठाण्यातच

नांदेड: हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीतील ही घटना आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हुंड्यात ठरलेले एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची विष पाजून हत्या केली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथील घटना आहे. 2 जुलै रोजी विवाह झाला होता. त्यानंतर 10 जुलै रोजी रात्री मारहाण करून विष पाजले. तर 13 जुलैला सायंकाळी 6 वाजता मृत्यू झाला. ताऊबाई राठोड असं मृत नवविवाहितेचं महिलेचे नाव आहे. या घटनेमध्ये मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सासरच्या चौघांविरुद्ध हत्या व हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी प्रेत चक्क 18 तास पोलीस ठाण्यात ठेवले होते. तसेच नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

हेही वाचा: कोंडीचा जाब विचारताच ऑफ ड्युटी पोलिसाला मारहाण; मनसेच्या निलेश बाणखेलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल

हुंड्यासाठी नवविवाहितेला विष पाजले 
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. हुंड्यासाठी नवविवाहित महिलेला विष पाजले आहे. नुकतच 2 जुलै रोजी महिलेचं लग्न झालं होतं. लग्नामध्ये हुंड्यात 1 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र ते एक लाख रुपये न मिळाल्याने विवाहितेला छळण्यात आले. लग्नानंतर अवघ्या आठव्या दिवशी नवविवाहितेला विष पाजण्यात आले. ताऊबाई राठोड असं या विवाहितेचं नाव आहे. लग्नाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ताऊबाईचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे तब्बल 18 तास प्रेत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. नातेवाईकांच्या मागणीनंचर पोलिसांनी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. 


सम्बन्धित सामग्री