सध्या, अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला मिळतात. जसे की मुंबईच्या लोकल ट्रेनमधील भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी गावामध्ये पाण्याच्या वादातून दोन बायकांमध्ये होणारे भांडण यासारख्ये अनेक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की, एक दुकानदार चक्क 25 रुपये उधारी न दिल्यामुळे एका महिलेला मारहाण करतो, तेही विवाहित महिलेला. ऐकायला काल्पनिक जरी वाटत असेल तरीदेखील ही सत्य घटना आहे. इतकंच नाही, तर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.
ही खळबळजनक घटना जालना शहरातील अशोक नगरमध्ये असलेल्या बरवार भागात घडली आहे. पीडित महिला किराणा दुकानावर दूध बिस्कीट आणण्यासाठी गेली होती. त्या दरम्यान, हा धक्कादायक प्रकार घडला होता.
हेही वाचा: पनवेलमधील खळबळ घटना! मुलीला 29 मजल्यावरून फेकून आईची आत्महत्या
25 रुपये उधारी न दिल्यामुळे महिलेला मारहाण:
12 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पीडित महिला किराणा दुकानात दूध बिस्कीट आणण्यासाठी गेली होती. पीडित महिला दुकानदार यांना 25 रुपये फोन पे केले. त्यानंतर त्या पीडित महिला दुकानदार यांचा मुलगा दुकानात आला आणि 25 रुपये सामानाच्या उधारीचे पैसे न दिल्याचा आरोपावरून विकास विलास मस्केने विवाहित महिलेला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर, दोघांमध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळचे रूपांतर हाणामारीत झाले.
दुकानदाराने विवाहित महिलेला चापट बुक्याने मारहाण केले:
शिवीगाळचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर, दुकानदार विकास विलास मस्केने त्या महिलेला चापट बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. दुकानदार विकास विलास मस्केने त्या महिलेसोबत लज्जास्पद कृत्य करून सार्वजनिक ठिकाणी त्या महिलेचा विनयभंगदेखील केला. यादरम्यान, पीडित महिलेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्या पीडित महिलेला घेऊन सामाजिक कार्यकर्त्या ममता कायंदे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून 74, 115(2), 352 कलमांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
सध्या, पीडित महिला जखमी असून एका खाजगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी विकास विलास मस्केवर कारवाई व्हावी अशी मागणी त्या पीडित महिलेच्या नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या ममतात कायंदे यांनी केली.