Sunday, August 31, 2025 11:35:41 AM

Mumbai Crime: गुप्तांग इस्त्रीने जाळले, केस कापले, चेहऱ्यावर ब्लेडने वार करत महिलेला अमानुषपणे मारहाण

कर्जाच्या वादातून महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. महिलेचे गुप्तांग इस्त्रीने जाळले, केस कापले, चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आहेत.

mumbai crime गुप्तांग इस्त्रीने जाळले केस कापले चेहऱ्यावर ब्लेडने वार करत महिलेला अमानुषपणे मारहाण

मुंबई : कर्जाच्या वादातून महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. महिलेचे गुप्तांग इस्त्रीने जाळले, केस कापले, चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आहेत. मारहाणीते चित्रीकरण करुन व्हिडीओ नातेवाईकांमध्ये शेअर करण्यात आला आहे. 

कांदिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला वसईतील एका घरात नेऊन तिच्या कुटुंबाने 21 लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून निर्दोषपणे मारहाण केली. कुटुंबाच्या सदस्यांकडून सदर घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडितेचे कपडे काढून तिला मारहाण केली. तिचे गुप्तांग इस्त्रीने जाळण्यात आले. त्याचबरोबर कात्रीने तिचे केस कापण्यात आले आणि चेहऱ्यावर ब्लेडने वार करण्यात आले. तिला आणखी अपमानित करण्यासाठी आरोपीने मारहाणीचे चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ नातेवाईक आणि मित्रांमध्ये प्रसारित केला. भीती आणि लाजेमुळे पीडित महिला चार दिवस गप्प राहिली. मात्र तिच्या पतीने व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने घटनेची माहिती दिली. 

हेही वाचा : Sanjay Raut : ठाकरे बंधुंच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन

कांदिवली येथील रहिवासी असलेली 43 वर्षीय पीडित महिला तिच्या पती आणि सहा मुलांसह राहते. या प्रकरणात पीडित महिलेच्या नवऱ्याने त्यांचे चारकोपचे घर विकले होते आणि तिच्या पतीच्या बहिणीच्या(नंणदेच्या) नवर्‍याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने कर्ज फेडण्यासाठी 21 लाख रुपये मागितले. तसेच गावातील जमीन विकल्यानंतर ते परत केले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर पतीच्या बहिणीच्या (नंणदेच्या) नवर्‍याला पैशांची मदत करण्यात आली. मात्र जेव्हा तिच्या कुटुंबाला नवीन घर खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांनी त्यांचा फोन उचलणे बंद केले. रमजानच्या काळात जेव्हा तिच्या सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांनी पुन्हा मदत मागितली. मात्र तेव्हा देखील पैशाची मदत केली नाही. ज्यामुळे तिच्या सासूचा मृत्यू झाला. 

5 एप्रिल रोजी तिच्या नंणदेच्या नवर्‍याने त्यांना पैसे घेण्यासाठी वसईला येण्यास सांगितले मात्र नवरा आजारी असल्याने ती दुसऱ्या दिवशी एकटीच गेली. पीडित महिला बेडरूममध्ये बसली होती तेव्हा अचानक त्याची दुसरी पत्नी मागून आली आणि केस ओढले. त्यानंतर तिला हॉलमध्ये नेऊन तिच्यावर प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आणि मारहाण केली. दरम्यान नंणदेच्या नवर्‍याने आणि त्याच्या मुलीने संपूर्ण हल्ला रेकॉर्ड केला. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून वसईच्या वालिव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री