बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची दिल्ली परिसरात पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीने हत्या केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. तर या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री निजामुद्दीन परिसरात ही घटना घडली. पीडित आसिफचा स्कूटर पार्क करण्यावरून एका अज्ञात व्यक्तीशी वाद झाला होता, जो गुन्हेगारी कृत्यापर्यंत पोहोचला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंडाने घेतली जबाबदारी
या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच एक धारदार शस्त्रदेखील जप्त केले आहे, ज्याचा वापर आरोपींनी आसिफ कुरेशीवर हल्ला करण्यासाठी केला होता. गुरुवारी रात्री शेजाऱ्याने आसिफच्या घरासमोर स्कूटर पार्क केल्यामुळे हा वाद झाला.