Sunday, August 31, 2025 07:01:19 AM

आदिनाथ कोठारेच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शन असलेल्या पाणी ने पटकावले 7 पुरस्कार !

अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

आदिनाथ कोठारेच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शन असलेल्या पाणी ने पटकावले 7 पुरस्कार

अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल ठरला आहे. पाणी ची गोष्ट ही खास ठरली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. पाणी मध्ये आदिनाथ ने दुहेरी भूमिका साकारून उत्तम  काम तर केलं पण अनेक फिल्म फेस्टीवल मध्ये पाणी ने विशेष कौतुक मिळवलं. 

हेही वाचा: Chhaava Box Office Collection : ‘छावा’ची जबरदस्त कमाई! ६ दिवसात बॉक्स ऑफिसवर २०० करोड पार

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पाणी ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन ( अनमोल भावे ) सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) सर्वोत्कृष्ट गीत (पाणी टायटल ट्रॅक आणि नाचनारा) आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गुलराज सिंग) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( आदिनाथ कोठारे) सर्वोत्कृष्ट चित्रपट ( पाणी ) असे तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत.

मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकच खास दिग्दर्शन करताना दिसतो येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाच दिग्दर्शन करणार असून वेगवेगळ्या भूमिका साकारणार असल्याचं कळतंय !
 


सम्बन्धित सामग्री