Wednesday, September 03, 2025 08:43:33 AM

वंदन हो ने अमृता करणार नव्या वर्षाची सुरुवात

संगीत मानापमान चित्रपटातील &quot वंदन हो &quot हे गाणं आमृतावर चित्रित करण्यात आलं असून अमृताच्या नृत्याची जादू या गाण्यातून अनुभवयाला मिळणार आहे.

वंदन हो ने अमृता करणार नव्या वर्षाची सुरुवात

 

मुंबई: नव्या वर्षात कलाकार काय काय प्रोजेक्ट करणार काय भूमिका साकारणार याची सगळ्याच प्रेक्षकांना उत्सुकता असताना अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर 2025 वर्षाची सुरुवात एका खास प्रोजेक्ट ने करणार आहे. 

2024 मध्ये "संगीत मानापमान" चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला आणि चित्रपटात अमृताची खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. या बहुचर्चित चित्रपटात अमृता पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. 14  गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट असलेला संगीत मानापमान येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

संगीत मानापमान चित्रपटातील " वंदन हो " हे गाणं आमृतावर चित्रित करण्यात आलं असून अमृताच्या नृत्याची जादू या गाण्यातून अनुभवयाला मिळणार आहे. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांची फौज दिसणार आहे पण सोबतीला अमृताची पाहुणी भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.

या बद्दल बोलताना अमृता सांगते "संगीत मानापमान सारख्या अप्रतिम चित्रपटात मला पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारायला मिळणं आणि माझ्यावर या चित्रपटातील मुख्य गाणं चित्रित होणं याहून सुंदर योग काय असेल ना ! नवीन वर्षाची सुरुवात मी वंदन हो सारख्या सुमधुर गाण्याने करतेय आणि संगीत मानापमान सारख्या चित्रपटाने करतेय याचा मला खूप आनंद आहे" 

2025 वर्षाची सुरुवात अमृता " संगीत मानापमान " ने करणार असली तरी वर्षभरात अमृता अनेक बॉलिवूड आणि मराठी प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. सोबतीला पठ्ठे बापूराव, ललिता बाबर आणि अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.
 


सम्बन्धित सामग्री