Wednesday, August 20, 2025 04:31:58 PM

'मला ते अश्रू आठवत राहतील, जे तू...' किंग कोहलीच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट

Anushka Sharma Post: विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनुष्का शर्मा भावुक झाली आणि तिने पोस्ट शेअर केली.

मला ते अश्रू आठवत राहतील जे तू किंग कोहलीच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट

Anushka Sharma Post: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सर्वच प्रसंगांमध्ये तिचा पती विराट कोहलीसोबत नेहमीच उभी राहते. ती प्रत्येक कठीण काळात विराटच्या पाठीशी उभी राहिली आहे. आज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर अनुष्का शर्मा भावुक झाली. तिने विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि एक पोस्टही शेअर केली आहे.

हेही वाचा - ..सगळ्या पाकिस्तान्यांची वृत्ती अशीच! 'मला सचिनला मुद्दाम दुखापत करायची होती,' शोएब अख्तरने स्वतःच सांगितलं

अनुष्का शर्मा भावुक झाली
अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कसोटी क्रिकेट सामन्याच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि अनुष्का शर्मानेही पांढरा ड्रेस घातला आहे. अनुष्काने लिहिले - 'ते (सर्वजण) रेकॉर्ड आणि महत्त्वाचे टप्पे याबद्दल बोलतील - पण तू कधीही न दाखवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेला संघर्ष आणि खेळाच्या या स्वरूपाला तू दिलेले अढळ प्रेम माझ्या लक्षात राहील. मला माहीत आहे की, या सर्व गोष्टींनी तुझ्यापासून इतर किती काही गोष्टी हिरावून घेतल्या. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर, तू थोडा आणखी समजदार, थोडे नम्र होऊन परतलास - आणि या सर्वांमधून तुला घडत असताना पाहणं हा एक भाग्याचा अनुभव आहे.'

अनुष्काने पुढे लिहिले - 'माहीत नाही कसं, मी नेहमीच अशी कल्पना केली होती की, तू पांढऱ्या कपड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होशील, अशी कल्पना मी करत होते. पण तू नेहमीच तुझ्या मनाचं ऐकलं आहेस  आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की, माझ्या प्रिया, तू या निरोपाचा प्रत्येक क्षण कमावला आहेस.'

हेही वाचा - 'दहशतवाद सहन केला जाणार नाही, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाका'; सौरव गांगुली यांची मागणी

दोघे विमानतळावर दिसले
विराटच्या निवृत्तीची घोषणा होण्यापूर्वी, विराट आणि अनुष्का दोघेही विमानतळावर दिसले. हे दोघेही कुठेतरी सहलीला निघाले आहेत, असे त्यांच्याकडे पाहून वाटत होते. त्यांचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विराटची निवृत्ती चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होती. चाहते निराश झाले आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, अनेक लोक सोशल मीडियावर विराटसाठी पोस्ट शेअर करत आहेत.


सम्बन्धित सामग्री