Wednesday, August 20, 2025 05:57:45 PM

Salman Khan Sikandar Leak: ईदपूर्वी सलमान खानला मोठा धक्का! 'सिकंदर' चित्रपट रिलीजपूर्वीच लीक

हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी इंटरनेटवर लीक झाला, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

salman khan sikandar leak ईदपूर्वी सलमान खानला मोठा धक्का सिकंदर चित्रपट रिलीजपूर्वीच लीक
Salman Khan Sikandar Leak
Edited Image

Salman Khan Sikandar Leak: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'च्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी इंटरनेटवर लीक झाला, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की हा चित्रपट अनेक पायरेटेड वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे. यावर कारवाई करत, निर्मात्यांनी तात्काळ पावले उचलली आणि सुमारे 600 वेबसाइटवरून चित्रपटाचे प्रिंट काढून टाकले.

दरम्यान, व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या वृत्ताला दुजोरा दिला आणि चित्रपटाच्या लीकचा निषेध केला. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'कोणत्याही निर्मात्याचे सर्वात वाईट स्वप्न म्हणजे त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लीक होतो. दुर्दैवाने, साजिद नाडियाडवालाच्या 'सिकंदर' सोबत असेच घडले, जो आज थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने 600 साइट्सवरून चित्रपट हटवला, पण तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. पायरसीच्या या कृत्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते,' असंही कोमल नाहटा यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेने प्रीती झिंटाला माफ केले होते 1.55 कोटी रुपयांचे कर्ज; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

तथापि, चित्रपट लीक झाल्याची बातमी मिळताच सलमान खानच्या चाहत्यांनी लोकांना आवाहन केले की, कोणीही हे लीक झालेले व्हर्जन शेअर करू नये. सोशल मीडियावरही, सलमानचे समर्थक #SayNoToPiracy मोहीम चालवत आहेत. 'सिकंदर' या चित्रपटातून सलमान खान दीड वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ईदची भेट म्हणून रविवारी, 30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

हेही वाचा - Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा जामीनासाठी अर्ज; आरोप खोटा असल्याचा केला दावा

चित्रपट लीक झाल्याने बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवर होणार परिणाम 

लीकनंतर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर थेट परिणाम होऊ शकतो. निर्माते आणि सलमान खानकडून चित्रपटाच्या लीकबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
 


सम्बन्धित सामग्री