Chhaava Box Office Collection Day 3 : ‘छावा’चे बॉक्स ऑफिसवर तुफान! तिसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि इतर प्रमुख कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळं छावा चित्रपटानें प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. छावानं प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई केली. आत्तापर्यंत छावाची कमाई किती झाली, रविवारी बॉक्स ऑफिसवर छावानं किती करोड रूपये कमावले याचा सविस्तर आढावा आपण घेऊयात...
छावाने तिसऱ्या दिवशी किती करोड कमावले
छावा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कमाईवर नजर टाकल्यास, छावाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३३.१ कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी शनिवार यात वाढ झाली. शनिवारी छावाने ३९.३ कोटी रूपयांचा गल्ला केला. तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटाने ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून यात वाढ किंवा कमी होऊ शकते. या कमाईसह छावाची एकूण तीन दिवसांची भारतातील कमाई ११६.९ कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचा - रणवीर अल्लाहबादियाने अल्पावधीतच गमावले 'इतके' लाख सबस्क्रायबर्स; ब्रँडिंग डीलवरही होऊ शकतो परिणाम
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे आणि संगीत ए. आर. रहमान यांनी दिलं आहे. चित्रपटाच्या कथानकात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील शौर्यगाथा प्रभावीपणे साकारण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक भावुक होत आहेत.
हेही वाचा - Chhaava Review : चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराष्ट्राला कायम गद्दारीने... नाहीतर, औरंगजेब...'
चित्रपटाच्या यशामध्ये उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि प्रभावी कथानकाचा मोठा वाटा आहे. सद्य परिस्थिती पाहता, आगामी काळातही या चित्रपटाची कमाई आणि लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.
छावा चित्रपटात कलाकारांची मांदियाळी
छावा चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्यासह विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, शुभांकर एकबोटे, डाएना पेंटी, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, रोहीत पाठक या कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.