हैदराबाद: दाक्षिणात्य अभिनेते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सतत चर्चेत असतात. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांची नावे अचानक समोर आल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. यामागील कारण कोणताही आगामी चित्रपट किंवा तत्सम चित्रपट नसून 'बेटिंग ॲप'चा घोटाळा आहे. बेटिंग ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक नाही दोन नाही तर तब्बल 29 सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील सायबराबाद पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात, ईडीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडापासून ते अगदी राणा दग्गुबतीपर्यंत इतर मोठ्या अभिनेत्यांवरही बारीक नजर ठेवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, या प्रकरणात नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. त्यासोबतच, असे म्हटले जात आहे की यात यामध्ये डिजिटल व्यवहारांचाही समावेश आहे. यापूर्वी, 19 मार्च रोजी मियापूर पोलिस ठाण्यात प्रकाश राज, राणा दग्गुबती, मंचू लक्ष्मी आणि निधी अग्रवाल यांच्या विरोधात बेटिंग ॲपचा प्रचार आणि समर्थन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादरम्यान, ईडीने तेलंगणातील 29 चित्रपट अभिनेते, युट्यूबर आणि इंस्टाग्राम प्रभावकांवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मियापूर येथील व्यावसायिक फणींद्र शर्मा (वय: 32) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा खटला सुरू करण्यात आला होता. तक्रारीत, ही बाब समोर आली की दाक्षिणात्य अभिनेत्यांकडून समर्थन दिल्या जाणाऱ्या या ॲप्समध्ये सामान्य नागरिक पैसे गुंतवत आहेत. तक्रारीनुसार, हे ॲप्स मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात आणत आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्याची दखल घेतली आहे आणि त्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी आणि तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅप्समध्ये हजारो कोटींचे व्यवहार होतात आणि तरुणांना सहज पैशाचे आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण या माध्यमातून सुरू आहे.
विजय देवेराकोंडाचं स्पष्टीकरण
दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या वतीने त्याच्या टीमने स्पष्ट केल्याप्रमाणे, विजय देवरकोंडाने फक्त गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चा प्रचार केला होता, जे 2023 मध्ये बंदही झाले होते. जेव्हा त्याच्या लक्षात आले की ते चुकीच्या उद्देशाने काम करत आहेत तेव्हा आपण स्वतःला यापासून दूर केले. त्यामुळे, या प्रकरणात ईडी कोणती कारवाई करणार आणि यातून कोणती माहिती समोर येईल हे पाहणे महत्वाचे असेल.
बेटिंग ॲप घोटाळ्यात 'या' कलाकारांची नावे समोर आली आहेत:
राणा दग्गुबती
प्रकाश राज
विजय देवरकोंडा
मंचू लक्ष्मी
प्रणीता
निधी अग्रवाल
अनन्या नागेला
सिरी हनुमंतू
श्रीमुखी
वर्षिनी सौंदरराजन
वासंती कृष्णन
शोबा शेट्टी
अमृता चौधरी
नयनी पवनी
नेहा पठाण
पांडू
पद्मावती
इम्रान खान
विष्णू प्रिया
हर्षा साई
बाय्या सनी यादव
श्यामला
चवदार
रिथू चौधरी
बंडारू शेषयानी सुप्रीता
बेटिंग ॲप्सचे व्यवस्थापन
किरण गौड
सोशल मीडियावर influencers अजय, सनी आणि सुधीर
यूट्यूब चॅनल 'लोकल बॉय नानी