Thursday, August 21, 2025 12:04:09 AM

फक्त तिकीटचं नाही, तर 'या' मार्गातून चित्रपटगृह कमावतात लाखो रुपये

लहान असो किंवा मोठे, आवडता चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करतात. मात्र, कधी तुम्ही विचार केला की, या सिनेमागृहांचा खरा पैसा कुठून येतो? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

फक्त तिकीटचं नाही तर या मार्गातून चित्रपटगृह कमावतात लाखो रुपये

मुंबई: लहान असो किंवा मोठे, आवडता चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करतात. इतकच नाही, तर एखादा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो, तेव्हा या चित्रपटांना पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहात गर्दी करतात. चित्रपट पाहणे हा अनेक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इतकच नाही, तर एखाद्या नामवंत अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला तर प्रेक्षक एकदा नाही, दोनदा नाही तर अनेकदा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जातात. मात्र, चित्रपटगृहात गेल्यावर सर्वप्रथम आपली नजर तिथे असणाऱ्या खाद्यपदार्थांवर, डिझाइन, आदी. गोष्टींकडे जाते. मात्र, कधी तुम्ही विचार केला की, या सिनेमागृहांचा खरा पैसा कुठून येतो? फक्त तिकिट विक्रीवर चित्रपटगृह चालते का? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

हेही वाचा: Navi Mumbai Crime : विवाहित महिलेशी प्रेमसंबंधांचा संशय, 25 वर्षीय तरुणाची रबाळे तलावात उडी

1 - तिकीट विक्री: प्रत्येक टिकिटातून मिळणारे पैसे पूर्णपणे चित्रपटगृहांच्या खिशात जात नाही. माहितीनिसार, जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा पहिल्या आठवड्यातील 50% ते 55% कमाई निर्माते आणि वितरक घेतात. यासह, उर्वरित रक्कम ही चित्रपटगृहाकडे जाते. विशेष बाब म्हणजे, चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून चित्रपटगृहांचा वाटा वाढतो. मात्र, तरीही चित्रपटगृहांची मुख्य कमाई दुसऱ्या मार्गांनी होते.

2 - फूड अँड बेव्हरेजेस: चित्रपटगृहांचे बहुतांश उत्पन्न पॉपकॉर्न आणि इतर खाद्य पदार्थांमधून येते. विशेष बाब म्हणजे, 30 रुपयांत मिळणारा पॉपकॉर्न चित्रपटगृहात 150 हून अधिक रुपयांना विकला जातो. इतकच नाही, तर बर्गर, सँडविच, समोसा किंवा कॉफी यांचे दर प्रचंड असतात. यातून मिळणारा नफा थेट चित्रपटगृहांच्या खिशात जातो. 

3 - ब्रँडिंग आणि जाहिरात: चित्रपट सुरू होण्यापूर्वी दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून चित्रपटगृह चांगली कमाई करतात. यासह, लॉबीमध्ये असलेले पोस्टर, स्क्रीनवर फ्लॅश होणारे ब्रँड, QR कोड स्कॅन करण्याचे ऑफर, या सगळ्यातून चित्रपटगृह मोठ्या प्रमाणात कमाई करतो. 

4  - खास शोसाठी चित्रपटगृह भाड्याने देणे: एखाद्या चित्रपटाच्या प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी, कंपन्यांच्या इव्हेंट्ससाठी किंवा शाळांचे शैक्षणिक शोसाठी चित्रपटगृह भाड्याने दिले जाते. यातून मिळणारा नफा थेट चित्रपटगृहांच्या खिशात जातो. 


सम्बन्धित सामग्री