लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा च्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मात्र, ही कथा चाहत्यांना फारशी रुचलेली नाही आणि त्यामुळे सोशल मीडियावर शोला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. नवीन कथानकात टप्पू आणि सोनूच्या नात्यात दुरावा दाखवला जात असून, दोघांचे पालक त्यांची वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न लावण्याच्या तयारीत आहेत.
गोकुळधाम सोसायटीतील भिडे हे नेहमीच शिस्तप्रिय आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठी जागरूक असतात. मात्र, आता त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवल्याने प्रेक्षकांना तो खलनायक वाटू लागला आहे. टप्पू-सोनूच्या प्रेमाचा शेवट बघून चाहते नाराज झाले असून, शोवर सास-बहू मालिकांसारखी नाट्यमय वळणे आणल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा : रणवीर अल्लाहाबादियाला मोठा दिलासा – सर्वोच्च न्यायालयाने शो सुरु करण्याची परवानगी दिली!
एका युजरने लिहिले, 'पोपटलालसाठी मुलगी मिळत नाही, पण टप्पू-सोनूची लग्न लावण्याची घाई झाली!' तर दुसऱ्याने म्हटले, 'शो आता पूर्णपणे बदलला आहे, सास-बहू ड्रामापेक्षा वेगळं काही राहिलं नाही.'
सोनूच्या भूमिकेत नवीन अभिनेत्री!
सोनूची भूमिका सध्या अभिनेत्री खुशी माळी साकारत आहे. याआधी ही भूमिका पलक सिधवानीने निभावली होती, परंतु व्यावसायिक वाढ आणि आरोग्याच्या कारणांमुळे तिने शो सोडला. पलकने निर्मात्यांवर शोमधून बाहेर पडताना अडथळे आणल्याचा आरोपही केला होता.
हेही वाचा : Celebrities Use These Perfumes: शाहरूख खान, रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम
शोचा भविष्यातील प्रवास कसा असेल?
तारक मेहता का उल्टा चष्मा गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. मात्र, नवीन ट्रॅकवरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रतिक्रियांमुळे निर्मात्यांना विचार करावा लागू शकतो. पुढील काही भागांमध्ये शोची दिशा ठरेल – टप्पू-सोनू एकत्र येतील की या प्रेमकथेचा शेवटच होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.