Sunday, August 31, 2025 02:56:02 PM

टीव्ही स्टार जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये अशी चर्चा सुरू आहे की प्रसिद्ध टीव्ही जोडी जय भानुशाली आणि माही विज घटस्फोट घेणार आहेत. यावर, माहीने मौन सोडले आहे.

टीव्ही स्टार जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट जाणून घ्या

मुंबई: मागील काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये घटस्फोट घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. अशातच, काही दिवसांपूर्वी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांचा देखील घटस्फोट होणार आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र, एका मुलाखतीत जेव्हा सुनिता अहुजा यांना, 'गोविंदा आणि तुम्ही घटस्फोट घेणार आहात का?' असं प्रश्न विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी या बातम्यांना 'निव्वळ अफवा आहेत', अशी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये अशी चर्चा सुरू आहे की प्रसिद्ध टीव्ही जोडी जय भानुशाली आणि माही विज घटस्फोट घेणार आहेत. यावर, माहीने मौन सोडले आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

जय आणि माही घटस्फोट घेणार?

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, 'प्रसिद्ध टीव्ही जोडी जय भानुशाली आणि माही विज घटस्फोट घेणार आहेत'. यावर माहीने मौन सोडलं आहे. हॅटरफ्लाय या युट्यूब चॅनलवर बोलताना माही म्हणाली की, 'असं असलं तरी मी तुम्हाला का सांगू? तुम्ही माझे काका आहात का? तुम्ही माझ्या वकिलाची फी द्याल का? लोक एखाद्याच्या घटस्फोटाला किंवा वेगळे होण्याला इतका मोठा मुद्दा का बनवतात?'. 

पुढे माही म्हणाली, 'माझ्या कमेंट्समध्ये लोक लिहितात की ''बरं, ते असंच होतं''. आताही लोक माझ्या कमेंट्समध्ये लिहितात की, ''माही चांगली आहे, जय असाच आहे''. तू कोण आहेस भाऊ? तुला काय माहिती आहे? मला सांग, तुला काय माहिती की तू इतका न्याय करतोस? ते काका-सारखे वागत आहेत'. 

समाज खूप जास्त प्रतिक्रिया देतात - माही

'मला वाटतं की समाज खूप जास्त प्रतिक्रिया देतात. ''अरे देवा, ती एकटी आई आहे, तिचा घटस्फोट झाला आहे''. आता एक सीन येईल. हा एक मोठा मुद्दा बनेल. दोघेही एकमेकांवर चिखलफेक करतील. घाण होईल. मला वाटतं समाजाकडून खूप दबाव आहे. आयुष्यात आपण विचार करतो - समाज काय म्हणेल. ही व्यक्ती काय म्हणेल, ती व्यक्ती काय म्हणेल. मला फक्त इतकच वाटतं की, 'जागा आणि जगू द्या, साधेपणाने', अशी प्रतिक्रिया माहीने दिली. 

जय आणि माहीचे 2011 मध्ये लग्न झाले होते. 2017 मध्ये दोघांनी राजवीर आणि खुशी यांना मुलांना दत्तक घेतले होते. 2019 मध्ये जय आणि माही यांची पहिली जैविक मुलगी तारा जन्माला आली. मात्र, अलिकडच्या काळात दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र पोस्ट करणे कमी केले आहे. मात्र, ते त्यांच्या तीन मुलांसोबत पोस्ट शेअर करत राहतात. यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे.


सम्बन्धित सामग्री