बेंगळुरू: कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील नर महाडेश्वर हिल्स वन्यजीव अभयारण्यात पाच वाघ मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एक वाघिण आणि चार बछड्यांचा समावेश आहे. वनमंत्री ईश्वर खांडे यांनी या पाच वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाच वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, सर्व प्रक्रिया आणि शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल, असं वन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - पुरीमध्ये आजपासून जय जगन्नाथचा जयघोष! भव्य-दिव्य रथयात्रेला आरंभ; काय आहे महत्त्व?
मध्य प्रदेशानंतर कर्नाटकात सर्वाधिक वाघ आहेत. येथे वाघांची संख्या 563 आहे. वन्यजीवांशी वाढत्या संघर्षामुळे, विशेषतः वाघ गुरांवर हल्ला करून त्यांना आपले शिकार बनवत असल्याने, गावकरी अनेकदा विष आणि सापळ्यांचा वापर करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. वन विभागाच्या पथकाने मृत वाघांचे नमुने घेतले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवले आहेत.
हेही वाचा - अबब! 'या' मंदिरात पडतो केशर आणि चंदनाचा पाऊस
दरम्यान, वनमंत्री ईश्वर खांडे यांनी 5 वाघांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं असून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. तथापी, वन अधिकाऱ्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी वाघिणीने एका गायीवर हल्ला केला होता. प्राथमिक अंदाजानुसार, या वाघांना विषबाधा करून मारण्यात आले आहे. विषारी अन्नामुळे वाघीण आणि तिच्या पिल्लांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यत वर्तवण्यात येत आहे.