Thursday, September 18, 2025 12:16:22 PM

Dashavatar Movie Leak : दशावतार चित्रपटाच्या लीकवर 'या' अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत; म्हणाली, 'आपल्याच माणसांनी...'

'दशावतार' हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटाबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे.

dashavatar movie leak  दशावतार चित्रपटाच्या लीकवर या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत म्हणाली आपल्याच माणसांनी

मुंबई: मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन चित्रपट प्रद्रशित होत आहेत. जारण, गुलकंद, अशा अनेक मराठी चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणले. काही दिवसांपूर्वी 'दशावतार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. कोकणच्या मातीत घडणारे दशावतारी नाटक परंपरा आणि संस्कृतीचे मानले जाते. त्यामुळे, जेव्हा 'दशावतार' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. 

अशातच, 'दशावतार' हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटाबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. कोकणची संस्कृती आणि दशावतारी नाट्यपरंपरेचे दर्शन घडवणारा 'दशावतार' हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे, 'दशावतार' चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना आणि नेटिझन्समा अशी विनंती केली आहे की, त्यांनी हा चित्रपट लीक करू नये.

'दशावतार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियदर्शिनीने सोशल मीडियावर चाहत्यांना विनंती केली आहे. प्रियदर्शिनी म्हणाली की, 'आपल्या दशावतार चित्रपटाला तुम्हा रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. मराठी चित्रपटाची ताकद काय आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय. पण त्याच वेळी काही लोक चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर डाऊनलोड करून पाहत आहेत. चित्रपटाच्या पायरसीविरूद्ध कारवाई सुरू आहेच. परंतु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं दु:खद आहे. चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन घ्यायचा अनुभव आहे. त्यापाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे. निदान मराठी माणसांनी तरी अशा चोरटेपणाला थारा देऊ नये. स्वत:ही अशी पायरेटेड प्रिंट फोनवर पाहू नये आणि इतरांनाही पाहण्यापासून रोखावं ही विनंती! आपल्याच सहकार्यातून मराठी चित्रपट जगणार, तगणार आणि वाढणार आहे'.

हेही वाचा: Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केला AI स्मार्ट चष्मा; आता फोनशिवाय पाहता येतील मेसेज आणि कॉल

चित्रपटात, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. विशेष म्हणजे, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासह, सुबोध खानेलकरांनी 'दशावतार' चित्रपटाची कथा खूप सुंदरपणे मांडली आहे. सोबतच, सुबोध खानेलकरांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केलं आहे. तसेच, महेश मांजरेकरांच्या एंट्रीने चित्रपटाला नवीन वळण मिळालं. दिलीप प्रभावळकर यांच्यासह, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे आणि अमेय वाघ यांसारख्या कलाकारंनी 'दशावतार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 


सम्बन्धित सामग्री