Friday, September 19, 2025 03:15:39 PM

Gopichand Padalkar Controversy: गोपिचंद पडळकरांच्या 'त्या' विधानावर राजकीय वर्तुळात खळबळ; शरद पवार गटाचे प्रवक्ते संतापले

गोपिचंद पडळकरांनी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. सोबतच, पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवरही टीका केली आहे.

gopichand padalkar controversy गोपिचंद पडळकरांच्या त्या विधानावर राजकीय वर्तुळात खळबळ शरद पवार गटाचे प्रवक्ते संतापले

मुंबई: भाजप आमदार गोपिचंद पडळकर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, गोपिचंद पडळकरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त टीका केली आहे. गोपिचंद पडळकरांनी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. सोबतच, पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवरही टीका केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गोपिचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, 'गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाने योग्य ती कारवाई करावी'. 

याप्रकरणी, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले की, 'मी गेल्या 40 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रातही काम करत आहे. मुळात राजकारणामध्ये एक नवीन फॅड आलं आहे. एखाद्या उच्च पदावर असलेल्या माणसावर टीका केली, की आपल्याला प्रसिद्धी मिळते हा एकप्रकारचा अहमपणा काही विशिष्ठ मंडळींच्या वाचाळवीरांच्या मनामध्ये निश्चित आहे. राजकारण करताना तुम्ही समाजाला काय दिशा दिला? गोपीचंद पडळकरांनी जयत पाटील यांच्या वडिलांबाबत जे वक्तव्य केलं आहे, याचं समर्थन भाजप मुळीच करत नाही'.

सोबतच, शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळेंनी सवाल केला की, 'आमच्या पक्षाचे नेते अशा प्रकारच्या खालच्या दर्जाची टीका केलेली मी तरी या 20-22 वर्षांत केलेली नाही. गोपिचंद पडळकर हे अजित पवारांवरही बोलतात, सुप्रिया सुळेंवरही बोलतात आणि बारामतीला जाऊन काहीही संबंध नसताना मोर्चे आणि आदोलने काढतात. याचा अर्थ असा आहे की गोपिचंद पडळकरांनी भाजपाची सुपारी घेतली. पडळकर कुणाची भाषा बोलत आहेत? का पडळकरांना लगाम लावला जात नाही? गोपिचंद पडळकरांना आळा घालायचं काम भाजप का करत नाही?'. पुढे, हेमा पिंपळे म्हणाल्या की, 'गोपिचंद पडळकरांना महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. ज्या पद्धतीने गोपिचंद पडळकर भाषा वपरत आहेत, मग ती कोणत्याही नेत्यावर असो, ती अतिशय या महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारी आहे'.


सम्बन्धित सामग्री