Vadodara-Anand bridge collapsed
वडोदरा: गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे, वडोदराच्या पाड्रा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवर बांधलेला 45 वर्षे जुना पूल आज सकाळी कोसळला. या घटनेत पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने माही नदीत पडली. पूल कोसळल्यामुळे एक टँकर अजूनही पुलावर लटकत आहे. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा मुजपूरसह जवळपासच्या गावातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली होती.
तीन जणांना वाचवण्यात यश -
हा पूल पाड्रा-गंबीरा पूल म्हणूनही ओळखला जातो. मुजपूर गावातील लोकांना हा पूल कोसळल्याची माहिती मिळताच लोक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यानंतर माही नदीत पडलेल्या वाहनांमधून तीन जणांना वाचवण्यात आले. मात्र, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर लगेचच 108 रुग्णवाहिकांना याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा - निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये देण्यात येणार फाशी; केरळमधील नर्सवर काय आरोप आहेत?
नदीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यांचा दावा आहे की, जुना पूल दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
वडोदरा-आनंदला जोडणार पूल कोसळला, पहा व्हिडिओ
हेही वाचा - पुलवामा हल्ल्याबाबत FATF चा मोठा खुलासा! 'येथून' खरेदी करण्यात आले स्फोटके
दरम्यान, स्थानिकांचा आरोप आहे की, इशारा देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, ज्यामुळे पूल कोसळला आणि अनेक लोक जखमी झाले. त्यांनी सांगितले की, वडोदरा आणि आणंद दरम्यानचा प्रमुख मार्ग असलेला गंभीर पूल गेल्या काही वर्षांत खूपच जीर्ण झाला होता आणि आता हा पूल जड वाहतुकीसाठी योग्य राहिला नाही.