Wednesday, August 20, 2025 05:51:54 PM

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या तारीखेसंदर्भात आले मोठे अपडेट; 'या' दिवशी होणार शपथविधी

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी नवनिर्वाचित भाजप आमदार 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात.

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या तारीखेसंदर्भात आले मोठे अपडेट या दिवशी होणार शपथविधी
Delhi New CM Announcement
Edited Image

Delhi CM Oath-Taking Ceremony: दिल्लीचे नवे मुख्यमंत्री 20 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक रामलीला मैदानावर शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष (भाजपा) राष्ट्रीय राजधानीत 27 वर्षांच्या दुष्काळाच्या समाप्तीच्या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भव्य उत्सवाचे नियोजन करत आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी नवनिर्वाचित भाजप आमदार 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी त्यांचे निरीक्षक पाठवेल, ज्यामध्ये दिल्ली विधानसभेतील सभागृह नेते निवडले जातील. 

हेही वाचा - 19 शहरांमध्ये सर्व दारूची दुकाने बंद राहणार; 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन धोरण

भाजपचे अनेक नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत - 

दिल्ली मुख्यमंत्री आणि मंत्रीपदासाठी अनेक नवनिर्वाचित आमदारांची नावे चर्चेत आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीत आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा आणि दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजेंदर गुप्ता आणि सतीश उपाध्याय यांची नावे सध्या मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - Abhinav Chandrachud: रणवीर अलाहबादीयाची केस लढवणारे अभिनव चंद्रचूड कोण आहेत? माजी सरन्यायाधीशांशी आहे 'हे' नातं

पक्षातील अनेकांचा असा विश्वास आहे की, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडप्रमाणे, भाजप नेतृत्व दिल्लीत देखील नवनिर्वाचित आमदारांपैकी एकाला दिल्लीची सत्ताधीकारी बनवेल. 

दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भारतीय जनता पक्ष 26 वर्षांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेवर आला. यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) 10 वर्षांचे राज्य संपले. राजधानीतील 70 पैकी 48 विधानसभा जागावर भाजपने कमळ फुलवले. 
 


सम्बन्धित सामग्री