Thursday, August 21, 2025 12:04:08 AM

'संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

नवी दिल्ली: एकीकडे, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे तेथील पर्यटनावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे, भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेबाबत सर्वपक्षीय बैठक झाली असून सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

पहलगाम या हल्ल्यात 27 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशासह जगभरातून रोष व्यक्त केला जात आहे. 'पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी देश-विदेशातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पाकिस्तानविरोधात योग्य कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. यावेळी 'संसदेमध्ये विशेष संसदीय अधिवेशन घेण्यात यावे', अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. त्यासाठी खरगेंनी पंतप्रधान मोदींना खास पत्र लिहिले आहे.

हेही वाचा: चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा

खरगेंचे मोदींना पत्र:

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र शेअर केले आहे. त्यांनी लिहिले की, 'या क्षणी, जेव्हा एकता आणि बंधुत्व आवश्यक आहे, तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षांचे मत आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या सामूहिक दृढनिश्चयाचे आणि इच्छाशक्तीचे हे एक शक्तिशाली प्रदर्शन असेल. आम्हाला आशा आहे की अधिवेशन योग्यरित्या बोलावले जाईल', अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राद्वारे केली आहे.


सम्बन्धित सामग्री