Wednesday, September 03, 2025 10:34:34 PM

Delhi Accident: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

दिल्लीच्या जनता मजदूर कॉलनीमध्ये शनिवारी चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

delhi accident दिल्लीत चार मजली इमारत कोसळली दोघांचा मृत्यू अनेक जण अडकल्याची भीती

नवी दिल्ली: दिल्लीच्या जनता मजदूर कॉलनीमध्ये शनिवारी चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या इमारतीखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इमारतीत राहणाऱ्या दहा सदस्यांसह इमारत कोसळण्याच्या वेळी जवळ असलेले काही लोक अडकले होते. 

दिल्ली अग्निशमन दलाने ही चार मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली एक पुरूष आणि एक महिला मृत आढळल्याची पुष्टी केली आहे. त्यांचे मृतदेह जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच 8 जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. 

हेही वाचा: अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या...

ही घटना घडल्यानंतर सात अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्य सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला सकाळी 7 वाजता इमारत कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर सात अग्निशमन दलाच्या गाड्यांसह आमचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे. 

दिल्लीतील मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी आहेत. इमारत कोसळ्याची घटना घडली. त्यावेळी अनेक जण इमारतीत असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल इमारत कोसळल्याच्या घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी एका महिला आणि पुरुषाला मृत अवस्थेत ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तसेच आठ जण जखमी अवस्थेत सापडले. त्या आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


सम्बन्धित सामग्री