Wednesday, September 03, 2025 10:13:33 AM

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; 8 वर्षांत 14 वेळा पॅरोल

राम रहीम मंगळवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला. त्यानंतर राम रहीम सिरसा येथील डेरा सच्चा सौदा मुख्यालयाकडे रवाना झाला.

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर 8 वर्षांत 14 वेळा पॅरोल
Gurmeet Ram Rahim

चंदीगड: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला पुन्हा एकदा हरियाणातील सुनारिया तुरुंगातून 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. खून आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरलेल्या राम रहीमसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची ही 14 वी वेळ आहे. 

कडक सुरक्षा व्यवस्थेत तुरुंगाबाहेर - 

राम रहीम मंगळवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला. त्यानंतर राम रहीम सिरसा येथील डेरा सच्चा सौदा मुख्यालयाकडे रवाना झाला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या याचिकेवर 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राम रहीम याला याआधी 9 एप्रिल 2025 रोजी 21 दिवसांच्या फर्लोवर सोडण्यात आले होते. त्याआधीही अनेकदा त्याला तात्पुरती सुटका देण्यात आली होती. इतक्या वारंवार आणि दीर्घकाळासाठी दिल्या जाणाऱ्या पॅरोल आणि फर्लोमुळे, गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरलेल्यांना मिळणाऱ्या सवलतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा - 'देशाने त्यांचा बालिशपणा पाहिला आहे'; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

राम रहीम याला दोन महिला अनुयायांवरील लैंगिक अत्याचार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. सध्या तो या प्रकरणांत शिक्षा भोगत असूनही त्याला वारंवार बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे, यामुळे न्यायप्रणालीवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री