Wednesday, August 20, 2025 03:56:29 PM

माल्ल्या ते मेहता जाणून घ्या भारतातील मोठी आर्थिक फसवणूक

गेल्या काही काळात असे देखील उद्योजक होऊन गेले ज्यांनी भारतातील बँकांना लुबाडून विदेशात आश्रय घेतले. चला तर आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत ते भारतीय उद्योजक ज्यांनी विदेशात आश्रय घेतले.

माल्ल्या ते मेहता जाणून घ्या भारतातील मोठी आर्थिक फसवणूक

भारत हा देश एकेकाळी सोन्याची चिमणी या नावाने प्रसिद्ध होते. परंतु मुघल त्यानंतर ब्रिटिश अश्या अनेक अनेक देशांनी केलेल्या आक्रमणामुळे भारताच्या आर्थिक सुव्यवस्थेवर परिणाम झाला. मात्र अलीकडे भारत देशाने हार न मानता आजच्या 21 व्या शतकात भारत देशाची आर्थिक स्थिती चांगली असून सध्या भारताची आर्थिक जीडीपी 3.57 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. 
               मात्र गेल्या काही काळात असे देखील उद्योजक होऊन गेले ज्यांनी भारतातील बँकांना लुबाडून विदेशात आश्रय घेतले. चला तर आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत ते भारतीय उद्योजक ज्यांनी विदेशात आश्रय घेतले. 

1 - मेहुल चोक्सी:

मेहुल चोक्सी यांचा जन्म 5 मे 1959 मध्ये महाराष्ट्राच्या मुंबई शहरामध्ये झाला असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहे आणि चोक्सी मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या फसवणूक प्रकरणामुळे फरार आहेत. सूत्रांनुसार मेहुल चोक्सी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत आहे त्यासोबतच त्यांची नागरिकता  अँटिग्वा आणि बारबुडा देशातील आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी एकत्र मिळून 14 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

2 - विजय माल्ल्या: 

विजय मल्ल्या यांचा जन्म भारतातील कर्नाटकातील मंगलोर येथील कोकणी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला असून विजय मल्ल्या यांचे वडील प्रसिद्ध उद्योजक होते आणि त्यासोबतच ते युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचे अध्यक्षदेखील होते. विजय मल्ल्याने विविध बँकांकडून 7 हजार 505 लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक करून सध्या विजय मल्ल्या आपल्या कुटुंबियांसमवेत लंडनमध्ये आश्रय घेतले आहे. विजय माल्ल्या भारतातील किंगफिशर बिअर, एअरलाइन्स आणि प्रसिद्ध भारतीय RCB क्रिकेट संघाचे मालक आहेत. 

3 - नीरव मोदी: 

नीरव मोदी प्रसिद्ध उद्योजक मेहुल चोक्सी यांचे पुतणे असून त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1971 रोजी गुजरात राज्यातील पालनपूरमध्ये झाला असून त्यांचे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून हिऱ्यांच्या व्यवसायात आहे. आतापर्यंत नीरव मोदी यांनी 28 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यासोबतच त्यांनी  पंजाब नॅशनल बँकेकडून 11 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. सूत्रांनुसार नीरव मोदी सध्या लंडनमधील जेल मध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. 

4 - हर्षद मेहता:

हर्षद शांतीलाल मेहता यांचा जन्म 29 जुलै 1954 रोजी गुजरात राज्याच्या राजकोटमधील छोट्याश्या व्यापारी कुटुंबात जन्म झाला होता. हर्षद मेहता यांनी 1984 मध्ये ग्रो मोअर रिसोर्सेस आणि ॲसेट मॅनेजमेंट या नावाने त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ब्रोकर म्हणून त्यांनी सदस्यत्व घेतले. इथूनच हर्षद मेहता यांची शेअर बाजाराचा 'किंग' म्हणून ओळख निर्माण झाली. ज्या हर्षद मेहताने 1980-90 च्या दशकात शेअर बाजाराची दिशा बदलली, त्याच हर्षद मेहताने शेअर बाजारात, शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीच्या प्रक्रियेत मोठे बदल घडवून आणले होते. ज्यामध्ये शेअर बाजाराच्या या घोटाळ्याला हर्षद मेहता स्वतः जबाबदार होता. सूत्रांनुसार, 90 च्या दशकात हा घोटाळा सुमारे 4000 कोटी रुपयांच्या आसपास होता, ज्याची सध्याची किंमत 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास असेल. 
             90 च्या दशकात मेहता यांनी केलेल्या घोटाळ्यावर 'स्कॅम 1992' या नावाने सोनी लाईव्हवर वेब सिरीजदेखील प्रदर्शित झाले आहे.


सम्बन्धित सामग्री