प्रसाद काथे, मुंबई: अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
अल कायदा ही इस्लामी अतिरेक्यांची दहशतवादी संघटना आहे. तिच्याशी निगडित चौघेजण पकडले गेले आहेत. मोहम्मद फैक, मोहम्मद फरदीन, सैफुल्ला कुरेशी, झिशान अली अशी अटकेत असणाऱ्या अतिरेक्यांची नावं आहेत. संशयास्पद ऍप वापरल्याने तपास यंत्रणेची नजर पडली. या अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर विरोधात प्रचार केल्याचे पुरावे सापडले आहेत. सोशल मीडियावर भारतविरोधी भावना भडकवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अहमदाबाद इथं दोन तर, नॉएडा आणि नवी दिल्लीतून प्रत्येकी एक अतिरेकी अटकेत आहेत.