कमी किंमतीत लांबचा प्रवास करण्यासाठी, आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यासोबतच, राष्ट्रीय एकतेला चालना देण्यासाठी रेल्वे वाहतूक सेवा अत्यंत महत्वाची आहे. सध्या, आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा खूप प्रगती करत आहे. त्यामुळे, भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे वाहतूक सेवा म्हणून ओळखले जाते. नुकताच, मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर हायस्पीड वेगाने वंदे भारत ही रेल्वे धावणार आहे अशी माहिती समोर येत आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का भारतात पहिली रेल्वे कधी आली होती? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
'या' दिवशी भारतीय रेल्वेची सुरुवात झाली:
भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 16 एप्रिल 1853 रोजी झाली होती. मुंबई (विक्टोरिया टर्मिनस, सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे धावली होती. या प्रवासात तीन वाफेच्या इंजिनांचा वापर करण्यात आला होता ज्यांची नावे सुलतान, सिंध आणि साहिब अशी होती. या रेल्वेने सुमारे 34 किलोमीटरचे अंतर कापले होते. ही रेल्वे 14 डब्यांची होती ज्यामध्ये 400 प्रवाशांनी प्रवास केले होते. भारतातील ही पहिली रेल्वे दुपारी 3.30 वाजता मुंबईतून (विक्टोरिया टर्मिनस, सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ठाणेला निघाली होती. सायंकाळी 4.45 वाजता ही रेल्वे ठाण्यात पोहोचली. हा रेल्वे प्रवास 55 मिनिटांत पूर्ण केला होता.
रेल्वे प्रवासाचे उद्घाटन यांच्या हस्ते झाले होते:
या ऐतिहासिक रेल्वे प्रवासाचे उद्घाटन लॉर्ड डलहौसी (Lord Dalhousie) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तेव्हा, तोफांची सलामी देऊन रेल्वेगाडीचा पहिला प्रवास साजरा करण्यात आला होता.
भारतातील रेल्वेचा विस्तार:
1853 नंतर भारतीय रेल्वेचा विकास वेगाने होऊ लागला. 1854 मध्ये भारतातील दुसरी रेल्वे पश्चिम बंगालमधील हावडा ते हुगळी दरम्यान चालवण्यात आली होती. हळूहळू, पुढील काही दशकांत संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे विस्तारले.