Suprme Court News: सर्वोच्च न्यायालयात एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी करताना महिला आरोपीच्या वकिलाने तिचे वजन जास्त असल्याने तिला वजन कमी करण्यासाठी जामीन द्यावा, असा अजब युक्तिवाद केला. 27 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, जेव्हा आरोपी महिलेच्या वकिलाने त्यांच्या अशिलाचे वजन जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांनी प्रश्न उपस्थित केला की, हा आधार देणे योग्य आहे का?
या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी टिप्पणी केली की आरोपी महिलेला तिचे वजन कमी करण्यासाठी कोठडीत ठेवले पाहिजे. स्वतःच्या अशिलाचा पक्ष मांडताना वकिलाने सांगितले की, ही आरोपी महिला आजारी आहे. तिचे वजनही वाढले आहे. ते कमी करण्यासाठी तिला जामीन द्यावा. यावर न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी उत्तर दिले, "तिला कोठडीत राहू द्या, जेणेकरून त्याचे वजन कमी होईल."
हेही वाचा - School Blast: विद्यार्थी की गुन्हेगार? शाळेतील शौचालयात घडवून आणला स्फोट; चौथीची मुलगी जखमी, कारण समजल्यावर सगळे हादरले
न्यायमूर्ती त्रिवेदी यापूर्वीही चर्चेत राहिल्या आहेत. मे 2024 मध्ये झालेल्या सुनावणीत त्यांनी सुप्रीम कोर्टाने जामिनाच्या प्रकरणांची सुनावणी करू नये असे सुचवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणाल्या होत्या, 'सर्वोच्च न्यायालयाने जामिनाच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, हे माझे मत आहे. हे फक्त उच्च न्यायालयापुरते मर्यादित असले पाहिजे. सध्या सर्वोच्च न्यायालय हे जामीन न्यायालय बनले आहे.'
न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी कोण आहेत?
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांचा जन्म 10 जून 1960 रोजी गुजरातमधील पाटण येथे झाला. त्यांनी एमएस युनिव्हर्सिटी वडोदरा येथून बी.कॉम-एलएलबी केले. गुजरात उच्च न्यायालयात सुमारे 10 वर्षे दिवाणी आणि घटनात्मक पैलूंवर वकील म्हणून काम केले. 10 जुलै 1995 रोजी अहमदाबाद येथील शहर दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांची थेट नियुक्ती झाली. 17 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
हेही वाचा - Mahakumbh Mela 2025 : 'आई कुंभमेळ्यात हरवली', हे ऐकताच मुलगा थेट पोहोचला प्रयागराजला; अन् बापाचं भयंकर कृत्य उघडकीस!
31 ऑगस्ट 2021 रोजी न्यायमूर्ती त्रिवेदी यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि हिमा कोहली यांच्यासोबत त्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे एकाच वेळी तीन महिला न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्येष्ठतेच्या बाबतीत, न्यायमूर्ती त्रिवेदी या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील अकराव्या महिला न्यायाधीश आहेत. 4 जानेवारी 2023 रोजी, न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी 2002 मध्ये बिल्किस बानोवर बलात्कार आणि हल्ला आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना मुदतपूर्व सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीपासून स्वतःहून माघार घेतली होती.