Saturday, September 06, 2025 02:19:25 PM

PM Modi On Trump: ट्रम्पच्या मैत्रीपूर्ण विधानावर मोदींचा सकारात्मक प्रतिसाद; असं काय म्हणाले पंतप्रधान?

मोदींनी म्हटलं आहे की, 'आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे पूर्ण समर्थन करतो.'

pm modi on trump ट्रम्पच्या मैत्रीपूर्ण विधानावर मोदींचा सकारात्मक प्रतिसाद असं काय म्हणाले पंतप्रधान

PM Modi On Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीपूर्ण वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोदींनी म्हटलं आहे की, 'आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे पूर्ण समर्थन करतो. भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि दूरदर्शी व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.' 

ट्रम्प यांचे वक्तव्य

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारत-अमेरिका संबंधांबाबत भूमिका स्पष्ट करताना मोदींबद्दल आपली मैत्री अधोरेखित केली. त्यांनी सांगितले, 'मी नेहमीच मोदींशी मैत्रीपूर्ण राहीन, ते एक महान पंतप्रधान आहेत. भारत आणि अमेरिकेचे विशेष संबंध आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही.' तथापी, जेव्हा त्यांना भारताला गमावण्याबद्दल त्यांच्या ट्रुथ सोशलवरील पोस्टबद्दल विचारले गेले, तेव्हा ट्रम्प म्हणाले, 'मला असे काही वाटत नाही. मी मोदींशी छान जुळते. काही महिन्यांपूर्वी ते येथे आले होते, आम्ही रोज गार्डनमध्ये एकत्र वेळ घालवला.' 

हेही वाचा - Department of War: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून होणार ‘युद्ध विभाग’; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

सध्या भारत-अमेरिका व्यापार संबंध तणावपूर्ण अवस्थेत आहेत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के पर्यंत कर लावला आहे. या धोरणामुळे भारतातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विरोधकांनी देखील पंतप्रधान मोदींवर या विषयावर कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी मोदींना मित्र म्हणणे आणि मोदींनी त्यांचे आभार मानणे हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा - Austrian Economist's Break India Post : कोण हा भारताविरुद्ध विष ओकणारा उपटसुंभ? म्हणे, भारताचे तुकडे..

ट्रम्प आणि मोदींच्या परस्पर मैत्रीपूर्ण भूमिकेमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मोठा प्रश्न असा आहे की ट्रम्प भविष्यातील टॅरिफ धोरणावर मृदू भूमिका घेतील का? जर तशी पावले उचलली गेली, तर व्यापार तणाव कमी होऊन संबंध अधिक सुदृढ होऊ शकतात. सध्या जगाचे लक्ष ट्रम्प यांच्या आगामी निर्णयांकडे आहे, जे भारत-अमेरिका भागीदारीसाठी निर्णायक ठरू शकतात.


सम्बन्धित सामग्री