नवी दिल्ली: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये तपासणीदरम्यान अनेक समस्या आढळून येत आहेत. एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर, ही विमान कंपनी सतत त्यांच्या विमानांची तपासणी करत आहे. रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला. एअर इंडियाच्या एका विमानाचे तिरुवनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्याच वेळी, त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे उड्डाण दुसऱ्या विमानात समस्या निर्माण झाल्यामुळे रद्द करावे लागले.
दिल्लीहून त्रिवेंद्रमला जाणाऱ्या विमानाला धडकला पक्षी -
प्राप्त माहितीनुसार, त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान एका विमानाने पक्षी धडकल्याने रद्द करण्यात आले. त्रवेंद्रम विमानतळावर उतरण्यापूर्वी, एअर इंडियाचे विमान उडवणाऱ्या पायलटने पक्षी धडकल्याची तक्रार केली होती. हे विमान दिल्लीहून त्रिवेंद्रमला जात होते. विमान त्रिवेंद्रममध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. हे विमान दिल्लीला परत जाणार होते, मात्र आता ते रद्द करण्यात आले आहे.
हेही वाचा - एअर इंडियाची फ्लाइट रद्द झाल्यास 'अशा' प्रकारे मिळवा तिकिटाचे पैसे
दिल्ली-कोची विमानाचे आपत्कालीन लँडिंग
तथापी, इंधन कमी असल्याने दिल्लीहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इंधन भरल्यानंतर विमान कोचीला रवाना झाले आणि सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
हेही वाचा - एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी; रियाधमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
अहमदाबाद विमान अपघात -
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 12 जून रोजी अपघात झाला होता. या विमानात 242 लोक होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. ज्या इमारतीशी विमानाची टक्कर झाली त्या इमारतीत उपस्थित असलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 270 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या अपघातानंतर एअर इंडिया सतत त्यांच्या विमानांची तपासणी करत आहे. तपासादरम्यान अनेक त्रुटी समोर आल्यानंतर एअर इंडियाची अनेक विमाने रद्द करण्यात येत आहेत.