लखनऊ : अभिनेत्री दिशा पटाणीच्या (Disha Patani) बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे. या गोळीबारात सहभागी असलेले दोन कुख्यात गुंड एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. हे बदमाश रोहित गोदारा-गोल्डी बराड गँगचे सक्रिय सदस्य होते.
कसा झाला एन्काउंटर?
बदमाशांची ओळख : ठार झालेल्या बदमाशांची नावे रविंद्र (निवासी रोहतक) आणि अरुण (निवासी सोनीपत) अशी आहेत. या दोघांवरही प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
संयुक्त कारवाई : दिल्ली आणि नोएडा एसटीएफ युनिटच्या संयुक्त कारवाईत ही चकमक गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटीमध्ये झाली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या पथकातील काही सदस्यही जखमी झाले. उपनिरीक्षक रोहित यांच्या डाव्या हाताला गोळी लागली, तर दोन हेड कॉन्स्टेबलही जखमी झाले.
गुन्हा आणि पुरावे: घटनास्थळावरून एक जिगाना पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गोळीबाराचे प्रकरण काय होते?
11 आणि 12 सप्टेंबर रोजी दिशा पटाणीच्या बरेली येथील घरावर दोन दिवसांत दोन वेळा गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. तपासामध्ये रोहित गोदारा आणि गोल्डी बराड यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि ऑडिओ तपासण्यात आले.
हेही वाचा - Disha Patani House Firing Case: 'आम्ही सनातनी आहोत...' दिशा पटानीच्या घरावरील गोळीबारावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया
रोहित गोदाराची धमकी
या घटनेनंतर रोहित गोदाराने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की, 'हा फक्त ट्रेलर होता.' दिशाची बॅडमिंटनपटू बहीण खुशबू पाटनीने सनातन धर्मगुरु प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर केलेल्या टिप्पणीचा हा बदला असल्याचे त्याने म्हटले होते.
आम्ही घाबरणार नाही
या धमक्यांनंतर दिशा पाटनीचे वडील जगदीश पटाणी यांनी मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की, "आम्ही अशा धमक्यांना घाबरणार नाही. हिंदू धर्मगुरूंसंदर्भात आमच्या मुलीने केलेल्या वक्तव्यावर ती ठाम आहे. तिच्या बोलणे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे."