Saturday, September 13, 2025 12:56:49 AM

Firing at Disha Patni's Bareilly House: बरेलीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना पहाटे अंदाजे 3:30 वाजता घडली असून, घरावर तीन ते चार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या.

firing at disha patnis bareilly house बरेलीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार

Firing at Disha Patni's Bareilly House: बरेलीत काल रात्री बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना पहाटे अंदाजे 3:30 वाजता घडली असून, घरावर तीन ते चार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - SC On Kangana Ranaut: 'तू मसाला लावलास...'; सर्वोच्च न्यायालयाकडून कंगना राणौतला झटका! न्यायालयाने फेटाळली याचिका

गोळीबारानंतर सुरक्षेत वाढ

घटनेनंतर बरेली पोलिसांनी तत्काळ दिशा पटानी यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली असून, परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित गोदार नावाच्या गुंडाने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. मात्र, ही पोस्ट अद्याप पडताळणीच्या प्रक्रियेत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Karishma Sharma Accident : चालत्या ट्रेनमधून पडली अभिनेत्री, रुग्णालयातील फोटो व्हायरल, कशी आहे आता तब्येत ?

पोलिसांचा इशारा 

वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, कोतवाली हद्दीतील निवृत्त सीओ जगदीश पटानी यांच्या घरावर हा हल्ला झाला असून, पोलिस आवश्यक ती कारवाई करत आहेत. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पुरेसा बंदोबस्त करण्यात आला आहे. गुन्हेगारांना लवकरच गजाआड करून कठोर कारवाई केली जाईल. 
 


सम्बन्धित सामग्री