Friday, September 12, 2025 10:37:41 PM

Zp President Reservation: आता जिल्हा परिषदांवर महिलांचे वर्चस्व! राज्यातील सर्व ZP अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

34 जिल्ह्यांपैकी तब्बल 18 जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नेतृत्व अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

zp president reservation आता जिल्हा परिषदांवर महिलांचे वर्चस्व राज्यातील सर्व zp अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

Zp President Reservation: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाने राजपत्रात हे आरक्षण प्रसिद्ध केले आहे. 34 जिल्ह्यांपैकी तब्बल 18 जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नेतृत्व अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. 

दरम्यान, राज्यातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असून, आगामी दोन ते तीन महिन्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असल्याने, राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगने तयारी सुरू केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षांना त्यांच्या उमेदवार निवडीसाठी रणनीती आखण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : संजय राऊतांवर कारवाई करा, शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

महिलांसाठी राखीव जागा असलेल्या जिल्हा परिषदा - 

महिलांसाठी ठाणे, रत्नागिरी, धुळे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  यापैकी काही जागा अनुसूचित जमाती किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी देखील राखीव आहेत.

हेही वाचा - Anjali Damania Post: 'राजकारणी कधी खरं बोलतात का?', अंजली दमानियांची पोस्ट व्हायरल

स्थानिक स्वराज्य संस्थांचा सध्या कारभार प्रशासकांच्या देखरेखीत सुरु असून, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि राजकीय बदलांमुळे निवडणुकीची प्रक्रिया काही काळ कोर्टात प्रलंबित होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित झाले आहे. या आरक्षणानंतर राज्यात महिला नेतृत्वाला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला उपस्थिती अधिक दृढ होईल. तथापी, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.  


सम्बन्धित सामग्री