उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठं संकट कोसळलं आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धारालीमध्ये खीर गंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे तिथे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसामुळे खीर गंगा नदीला आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक वाहून गेल्याची भीती आहे.
हेही वाचा: निसर्गाच्या सानिध्यात आजोबांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा बघाच...
समुद्रसपाटीपासून 8,600 फूट उंचीवर असलेल्या धाराली शहरातील हॉटेल्स आणि निवासी इमारतींना पुराचा तडाखा बसला आहे. रहिवाशांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये पाण्याच्या महाकाय लाटा परिसरातून वाहत असून लोक आणि घरांसह त्यांच्या मार्गातील सर्व काही गिळंकृत करताना दिसत आहेत.
उत्तरकाशी ढगफुटी पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी संवाद साधला आणि केंद्राच्या मदतीचे आश्वासन दिले. लोक जीव वाचवण्यासाठी पळून जाताना आणि ओरडताना दिसले. लोकप्रिय पर्यटन शहराचा संपूर्ण बाजार परिसर काही मिनिटांतच वाहून गेला आणि तो परिसर गाळाने भरलेल्या नदीच्या पात्रासारखा दिसला. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि घरांसह किमान 25 आस्थापने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे 60-70 लोक बेपत्ता आहेत किंवा परिसरात अडकले असण्याची शक्यता आहे.