Sunday, August 31, 2025 07:01:27 AM

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाते.

pm kisan yojana पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

मुंबई: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाते.  डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून, ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2 हजार रुपये) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सरकारने वेळोवेळी या योजनेचे 19 हप्ते वितरित केले आहेत. मात्र, 20 व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: 'संस्थेद्वारे होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी' - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

'या' दिवशी शेवटचा हप्ता जमा झाला होता

24 फेब्रुवारी 2025 रोजी सरकारने शेवटचा म्हणजेच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. जून 2024 मध्ये 18 वा हप्ता आणि 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता जारी झाला होता. या कारणामुळे, 20 वा हप्ता जून 2025 मध्ये येण्याची अपेक्षा होती. मात्र, जुलै महिना संपत आला तरी, कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

पीएम किसान योजनेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात, जे तीन टप्प्यांमध्ये 2 हजार रुपयांचे हप्ते म्हणून वितरित केले जातात. यासह, ही रक्कम थेट आणि कोणत्याही मध्यस्थीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. जर अजूनही तुम्हाला तुमचा 20 वा हप्ता नाही मिळाला, तर काळजी करण्याची गरज नाही. लवकरच याबाबतची माहिती सरकार देऊ शकते. सरकारकडून अधिकृत माहिती येईपर्यंत शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे खात्याची स्थिती तपासत राहावी.
 


सम्बन्धित सामग्री