Sunday, August 31, 2025 11:16:26 AM

दिल्लीत विरोधी पक्षनेता कोण असेल? अतिशी यांना मिळू शकते का संधी? वाचा सविस्तर वृत्त

राजधानी दिल्लीत भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता (LoP) कोण असेल याकडे लागले आहे.

दिल्लीत विरोधी पक्षनेता कोण असेल अतिशी यांना मिळू शकते का संधी वाचा सविस्तर वृत्त
Atishi, Sanjeev Jha, Gopal Rai
संपादित प्रतिमा

Leader of Opposition In Delhi: आज राजधानी दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल 27 वर्षांनंतर राजधानीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. गुप्ता यांच्यासोबत परवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज सिंग यांना उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी पदाची शपथ दिली. रामलीला मैदानावर झालेल्या या भव्य शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे वरिष्ठ नेते आणि एनडीएचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

हेही वाचा - रेखा गुप्ता यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार; पहिली मंत्रिमंडळ बैठक संध्याकाळी 7 वाजता होणार

रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. गुप्ता या देशातील भाजप शासित राज्यातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. राजधानी दिल्लीत भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता (LoP) कोण असेल याकडे लागले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर, आम आदमी पक्षाने अद्याप विरोधी पक्षनेत्याची घोषणा केलेली नाही. विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेसाठी आपमधील अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा -दिल्लीतील महिलांसाठी खूशखबर! महिला समृद्धी योजनेअंतर्गत 'या' तारखेपर्यंत मिळणार 2500 रुपये

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी 'या' नावांची चर्चा -  

अतिशी 

माजी मुख्यमंत्री हे या पदासाठी आघाडीच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्या कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, जिथून त्या सलग दुसऱ्यांदा जिंकल्या.

गोपाल राय - 

ज्येष्ठ आप नेते 2025 पासून अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात होते. ते बाबरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, जिथे ते सलग तिसऱ्यांदा जिंकले.

संजीव झा - 

ज्येष्ठ आप नेते संजीव झा यांनाही दावेदारांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. ते बुरारी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, जिथून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाला फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि सोमनाथ भारती यांच्यासह अनेक प्रमुख आप नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 
 


सम्बन्धित सामग्री