Milk Price Drop: देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून अमूल आणि मदर डेअरी यांसारख्या प्रमुख डेअरी ब्रँड्सच्या दुधाच्या किमती कमी होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत दूध आणि चीज यांसारख्या आवश्यक उत्पादनांवरील 5 टक्के जीएसटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी शेकडो रुपयांची बचत होईल.
दुधाच्या दरात किती होणार कपात?
जीएसटी हटवल्यानंतर दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची घट अपेक्षित आहे.
अमूल गोल्ड (फुल क्रीम) : 69 वरून 65 ते 66 रुपये
अमूल टोन केलेले दूध : 57 वरून 54 ते 55 रुपये
म्हैशीचे दूध : 75 वरून 71–72 रुपये
मदर डेअरी फुल क्रीम : 69 वरून 65–66 रुपये
मदर डेअरी टोन्ड दूध : 57 वरून 55–56 रुपये
डबल टोन्ड केलेले दूध : 51 वरून 48–49 रुपये
टोकन दूध : 54 वरून 51–52 रुपये
हेही वाचा - C P Radhakrishnan : कोयम्बतूरपासून दिल्लीपर्यंत.. कसा आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा प्रवास?
कंपन्यांची प्रतिक्रिया
अमूल आणि मदर डेअरीने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांना त्याचा पूर्ण फायदा दिला जाईल. तसेच, या बदलामुळे दुधाची मागणी वाढेल आणि दुग्ध क्षेत्रालाही नवीन ऊर्जा मिळेल.
हेही वाचा - EPFO Rules on Interest: नोकरी सोडल्यानंतर PF वर व्याज मिळते का? काय आहे EPFO चा नियम? जाणून घ्या
ग्राहकांना दिलासा
सध्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवरील कर हटवल्याने मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या कुटुंबांच्या दैनंदिन अर्थसंकल्पावर सकारात्मक परिणाम होईल.