Monday, September 01, 2025 12:31:17 AM

युट्यूबर ज्योती मल्होत्राने 3 वेळा दिली मुंबईला भेट; गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन असणारी ज्योती मल्होत्राने एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा मुंबईला भेट दिली. इतकंच नाही, तर गणेशोत्सवाच्या काळातही ज्योती मल्होत्रा मुंबईला आली होती.

युट्यूबर ज्योती मल्होत्राने 3 वेळा दिली मुंबईला भेट गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर

मुंबई: गद्दार ज्योती मल्होत्राला 17 मे रोजी अटक केल्यानंतर नुकतेच तिचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत असलेले कनेक्शन समोर आले आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्याबाबत एक मोठी अपडेट मिळाली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन असणारी ज्योती मल्होत्रा एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा मुंबईला भेट दिली आहे. इतकंच नाही, तर गणेशोत्सवाच्या काळातही ज्योती मल्होत्रा मुंबईला आली होती. गर्दीच्या ठिकाणी जसे की लालबागचा राजा आणि गणेशगल्लीचा राजा अशा वर्दळीच्या ठिकाणी तिचा वावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासोबतच, मुंबईला आल्यानंतर ज्योती मल्होत्राने दोन वेळा ट्रेनने तर एकदा बेस्ट बसने प्रवास केला आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीन वेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईला भेट दिली होती. दरम्यान, मुंबईची तिने रेकी केली होती का? त्यामागचा उद्देश काय होता? याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे.

कोण आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा?

1 - ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर आहे, जी 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे यूट्यूब चॅनल चालवते. तिच्या 'ट्रॅव्हलविथजो१' या इंस्टाग्राम हँडलला १.३७ लाख फॉलोअर्स आहेत.

2 - ऑपरेशन सिंदूरपासून भारतीय गुप्तचर संस्था हाय अलर्टवर आहेत. गुप्तचर विभागाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली देशाच्या विविध भागातून अनेक लोकांना अटक केली आहे, त्यापैकी एक प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे.

3 - पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.

4 - दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीमध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा सहभागी झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

5 - युट्यूबर ज्योतीचे पाकिस्तान कनेक्शन उघडकीस आले आहे.

6 - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीपासून ते विविध सैनिक अधिकाऱ्यांसोबत तिचे जवळचे संबंध उघडकीस आले आहेत.

7 - तसेच, युट्यूबर ज्योती मल्होत्राने देशांतर्गत संवेदनशील माहिती पुरवल्याचेही तपासात उघडकीस झाले आहे.

8 - त्यासोबतच, तिने पाकिस्तानी एजंटाला देशातील सुरक्षा स्थळांची माहिती पुरवल्याचे समोर आले आहे.

9 - तिच्याविरोधात अधिकृत गुपित कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


सम्बन्धित सामग्री