Thursday, September 18, 2025 11:53:26 AM

Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केला AI स्मार्ट चष्मा; आता फोनशिवाय पाहता येतील मेसेज आणि कॉल

हे प्रगत एआय स्मार्ट ग्लासेस आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना फोन न काढताच मेसेज वाचणे, फोटो, व्हिडिओ प्रिव्ह्यू पाहणे, लाईव्ह कॉलिंग करणे आणि नेव्हिगेशन वापरणे शक्य होणार आहे.

meta smart glasses मार्क झुकरबर्गने लाँच केला ai  स्मार्ट चष्मा आता फोनशिवाय पाहता येतील मेसेज आणि कॉल

Meta Smart Glasses: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नवीन मेटा रे-बॅन डिस्प्ले ग्लासेस लाँच केले आहेत. हे प्रगत एआय स्मार्ट ग्लासेस आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना फोन न काढताच मेसेज वाचणे, फोटो, व्हिडिओ प्रिव्ह्यू पाहणे, लाईव्ह कॉलिंग करणे आणि नेव्हिगेशन वापरणे शक्य होणार आहे. या चष्म्यांसोबत ईएमजी न्यूरल रिस्टबँड दिला जातो, जो स्नायूंच्या हालचालींवर कार्य करतो. या बँडच्या मदतीने वापरकर्ते स्क्रीनला स्पर्श न करता स्क्रोल, टाइपिंग आणि म्युझिक कंट्रोल करू शकतात.

हेही वाचा - Artificial Intelligence: आठवड्यात फक्त तीन दिवस काम? झूमच्या CEOचा मोठा दावा

मेटा रे-बॅन डिस्प्लेचे मुख्य फीचर्स

एआय व्हिज्युअल असिस्टंट : फोन न वापरता स्टेप-बाय-स्टेप सूचना व सहाय्य.
मेसेजिंग व कॉलिंग : WhatsApp व Messenger वर मेसेज, लाईव्ह व्हिडिओ व कॉन्फरन्स कॉल.
कॅमेरा व फोटो प्रिव्ह्यू : उच्च-रिझोल्यूशन फोटो व व्हिडिओ कॅप्चरिंगसाठी विशेष सुविधा.
रिअल-टाइम नेव्हिगेशन : पादचाऱ्यांसाठी नकाशे व दिशानिर्देश.
लाईव्ह कॅप्शन व भाषांतर : त्वरित ट्रान्सलेशन सुविधा.
म्युझिक कंट्रोल : फोन न वापरता गाणी बदलणे व आवाज नियंत्रित करणे.

डिझाईन व वापर

हलके, स्टायलिश आणि सामान्य चष्म्यांसारखे दिसणारे.
उच्च-कव्हरेज, फुल-कलर, हाय-रेझोल्यूशन डिस्प्ले.
डिस्प्ले इच्छेनुसार ऑन/ऑफ करता येतो.
ईएमजी रिस्टबँड टिकाऊ, वॉटरप्रूफ व लाँग बॅटरीसह.

हेही वाचा - Apple iPhone 17 : ॲपलने iPhone 17 सिरीज, iPhone Air सिरीज केली लाँच

मेटा रे-बॅन डिस्प्लेची किंमत किती आहे?

या चष्म्यांची किंमत अंदाजे 799 डॉलर किंवा 67,000 रुपये आहे. अमेरिकेत, हा चष्मा 30 सप्टेंबर 2025 पासून बेस्ट बाय, लेन्सक्राफ्टर्स, सनग्लास हट आणि रे-बॅन स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. 2026 पर्यंत, हे उपकरण कॅनडा, फ्रान्स, इटली आणि यूकेमध्ये देखील उपलब्ध असेल. हा चष्मा पूर्ण 6 तासांच्या चार्जवर त्याची बॅटरी लाइफ 30 तास चालेल असा अंदाज आहे. हे लेन्स घरातील आणि बाहेरील दोन्ही वापरासाठी योग्य असतील.


सम्बन्धित सामग्री