Monday, September 15, 2025 05:29:40 PM

Sachin Tendulkar's Plane Emergency Landing : वादळामुळे सचिन तेंडुलकर अडकला आफ्रिकेच्या घनदाट जंगलात! पाहा Video

या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

sachin tendulkars plane emergency landing  वादळामुळे सचिन तेंडुलकर अडकला आफ्रिकेच्या घनदाट जंगलात पाहा video

Sachin Tendulkar's Plane Emergency Landing : मैदानावर बॉलर्सची भंबेरी उडवणारा आणि लाखो चाहत्यांच्या हृदयाचा सम्राट असलेला 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यावेळी मात्र स्वतः एका थरारक परिस्थितीत अडकला होता. याचा व्हिडिओ त्याने स्वतः त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलातील एका मातीच्या धावपट्टीवर विमानाचे आपात्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले.

नेमकं काय घडलं?
सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत ही अविश्वसनीय घटना सांगितली आहे. तो केनियाच्या प्रसिद्ध मासाई मारा (Masai Mara) जंगलावरून उड्डाण करत असताना, दूरवर एक भयानक वादळ दिसले. वादळाचा जोर इतका होता की, पायलटला दोनदा विमानाचे लँडिंग रद्द करावे लागले. विमानात काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. अखेर, मोठ्या प्रयत्नांनंतर, धावपट्टीपासून दोन किलोमीटर दूर एका मातीच्या सपाट जागेवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

व्हिडिओमध्ये सचिन दाखवतो की, विमानाचे लँडिंग मातीच्या रस्त्यावर झाले आहे आणि समोर घनदाट जंगल आहे. तो सांगतो की, वादळ आणि पाऊस यामुळे विमान पुन्हा उड्डाण करू शकत नाही. तेथून त्यांना घेऊन जाण्यासाठी जीप येत आहे. पण, जर जीप वेळेवर नाही आल्या, तर रात्र याच जंगलात काढावी लागेल!

हेही वाचा - Acharya Devavrata Oath Ceremony: आचार्य देवव्रत यांनी संस्कृतमध्ये घेतली राज्यपालपदाची शपथ; पहा व्हिडिओ

'हाही एक अनुभव एन्जॉय करण्यासारखा आहे!'
अशा गंभीर परिस्थितीतही सचिनची सकारात्मकता वाखाणण्याजोगी होती. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नाही. उलट, नवीन अनुभवाविषयी उत्सुकता आहे. तो म्हणतो, "हाही एक अनुभव एन्जॉय करण्यासारखा आहे!"
सचिनने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच तो व्हायरल झाला आहे. मैदानावर अनेक विक्रम मोडणाऱ्या सचिनचा हा धाडसी आणि थरारक अनुभव पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत.

पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Friends Indeed : सिंहीणींच्या तावडीत सापडली म्हैस; इतर म्हशींनी आणलं मृत्यूच्या जबड्यातून परत; पाहा Video


सम्बन्धित सामग्री