Sunday, September 14, 2025 06:01:22 PM

Stock Market: पुढील आठवड्यात शेअर बाजार वाढणार की घसरणार? 'हे' मोठे घटक ठरवतील बाजाराची दिशा

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-भारत व्यापार आघाडीवरील घडामोडी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) प्रवाह, रुपया-डॉलर कल आणि कच्च्या तेलाच्या किंमती देखील बाजारातील हालचालींवर निर्णायक ठरतील.

stock market पुढील आठवड्यात शेअर बाजार वाढणार की घसरणार हे मोठे घटक ठरवतील बाजाराची दिशा

Stock Market: या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजाराची दिशा प्रामुख्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीचा निकाल आणि घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई डेटा यावर अवलंबून राहणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-भारत व्यापार आघाडीवरील घडामोडी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) प्रवाह, रुपया-डॉलर कल आणि कच्च्या तेलाच्या किंमती देखील बाजारातील हालचालींवर निर्णायक ठरतील.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीणा यांनी सांगितले की, 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) बैठकीचे निकाल हे आठवड्याचे प्रमुख आकर्षण ठरतील. यूएस रोजगार बाजारातील मंदी लक्षात घेता, व्याजदरात किमान 0.25 टक्क्यांची कपात होण्याची अपेक्षा आहे. 

हेही वाचा - Income Tax Return Due Date : ITR भरण्यासाठी आता उरला एक दिवस , तारीख वाढणार का ?

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 1,193.94 अंकांची (1.47%) वाढ नोंदवली, तर निफ्टी 373 अंकांनी (1.50 टक्के) वर गेला. निफ्टीने सलग 8 व्यांदा वाढ दाखवली, तर सेन्सेक्स सलग 5 दिवस नफ्यात राहिला. एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर यांच्या म्हणण्यानुसार, फेडकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे जागतिक बाजारात आशावाद वाढला आहे. यामुळे जोखीम घेण्याची प्रवृत्ती दिसत आहे. 

हेही वाचा - Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा दर

दरम्यान, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी सांगितलं की, भारतीय शेअर बाजार हळूहळू वाढत राहील. GST दरकपातीनंतर ग्राहकांच्या खर्चात वाढ, फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चांमधील सुधारित भावना हे बाजाराला आधार देतील.

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!) 


सम्बन्धित सामग्री