Thursday, September 04, 2025 12:19:33 AM

मुंबईत होणार शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ

शिवसेना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार

मुंबईत होणार शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंधेरी पूर्व येथील शेरे पंजाब मैदानात सभा घेणार आहेत. या सभेद्वारे शिवसेना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. भाऊबीजेचा योग साधून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने केलेली विकासकामं, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ सारख्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना यांची माहिती देत मुख्यमंत्री प्रचाराचा शुभारंभ करतील. शिवसेनेच्या यंदाच्या प्रचारात राज्याचा विकास, राज्यात आलेली गुंतवणूक, राज्यात वेगाने वाढत असलेले उद्योग, विरोधकांनी केलेला भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री